एक्स्प्लोर

तुमची कुवत नसल्यास शिवसेना शिवरायांवर छत्र उभारेल : उद्धव

छत्रपतींच्या डोक्यावरती छत्र बसवण्याची तुमची कुवत नसेल, तर तसं सांगा, शिवप्रेमी ते उभारल्याशिवाय राहणार नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई : मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ शिवाजी महाराजांना उन्हातान्हात एकटं उभं करुन ठेवलं आहे. तुमची कुवत नसल्यास सांगा, शिवसेना इथे रायगड उभा करेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करुन शिवसेनेने तिथीनुसार शिवजयंती साजरी केली. 'गेली काही वर्ष शिवजयंतीला शिवभक्त इथे जमतात. आमचे महाराज इथे एकटेच उन्हातान्हात उभे करुन ठेवले आहेत. मात्र आता आम्ही हे पाहणार नाही, आमच्याकडून ते सहन होणार नाही. जीव्हीके, एअरपोर्ट ऑथरिटी यांना आम्ही वारंवार सांगितलं. तुमच्याकडून होत नसेल तर शिवसेना इथे रायगड उभारल्याशिवाय राहणार नाही. छत्रपतींच्या डोक्यावरती छत्र बसवण्याची तुमची कुवत नसेल, तर तसं सांगा, शिवप्रेमी ते उभारल्याशिवाय राहणार नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई विमानतळावर शिवशाही, शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन
'शिवजयंती केवळ शिवजन्मापुरती मर्यादित नाही. आपण शिवरायांना दैवत का मानतो, तर 300-400 वर्षांपूर्वी संपूर्ण हिंदुस्थान हिरव्या अंधाराने व्यापून गेला होता. त्याला छेद देऊन तमाम हिंदू, हिंदुस्थानाचा शिवरायांनी पुनर्जन्म घडवला, तो आपल्या पुनर्जन्माचा दिवस. म्हणून इतक्या वर्षांनंतरही आपण त्यांना मानाचा मुजरा द्यायला जमतो. शिवरायांना साजेसा सण साजरा करणारा मर्द शिवसैनिक आजही जिवंत आहे, याचा आनंद, अभिमान आहे.' अशा भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या. पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा आहे. या पुतळ्यासमोर रायगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. एका बाजूला महाराजांची मेघडंबरी आणि समाधी असा भव्य सेट तयार करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पाहा व्हिडिओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget