एक्स्प्लोर

आता ठाकरे सरकार, मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी मांडला. या ठरावाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांनी एकमताने अनुमोदन दिले.

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर मुख्यमंत्रीपदासाठी बहुमताचा आकडा असलेल्या 'महाराष्ट्र विकास आघाडी'कडून उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. महाविकासआघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून त्यांच्या नावाचा ठराव राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी या बैठकीत ठेवला. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी मांडला. या ठरावाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांनी एकमताने अनुमोदन दिले. ज्यांच्यासोबत 30 वर्ष मैत्री केली त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही पण जे 30 वर्ष विरोधक होते त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. यावेळी शरद पवार, सोनिया गांधी यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे त्यांनी आभार मानले. आपण सगळी मैदानातली माणसं आहोत, त्यामुळे आपल्या खेळायचं कसं हे सांगायची गरज नाही, असे ठाकरे यावेळी म्हणाले. विजयानंतर बाळासाहेबांची आठवण येत आहे, असेही ते म्हणाले. गरज सरो आणि वैद्य मरो अशी भाजपची वर्तणूक होती, असेही ते म्हणाले. शिवसेना आणि भाजपमध्ये काही ठरलंच नाही असं देवेंद्र फडणवीस यांचे वाक्य आज मनाला लागले. मी खोट्याची साथ देणार नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईल.  भाजपला सेनेबद्दल द्वेष आहे. गरजेवेळी सेनेचा वापर केला, असेही ते म्हणाले. मला संघर्षाच्या वेळी नाही तरी संघर्षातून विजय मिळाल्यावर बाळासाहेब यांची आठवण येते. जीवनात कमावले काय आणि गमावले ते काय हे आज समजले, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. आपले सरकार हे एक कुटुंब आहे . सर्व सामान्य माणसाला माझे सरकार आहे असे वाटले पाहिजे, असेही ते म्हणाले. सरकार स्थापन झाल्यावर शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार असल्याचे देखील ते म्हणाले. मोठ्या भावालाही दिल्लीमध्ये जाऊन भेटणार असल्याचे ठाकरे म्हणाले. या बैठकीत सुरुवातीला दोन ठराव मांडण्यात आले. यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत आभार मांडण्याचा ठराव पहिल्यांदा मांडला गेला. यानंतर  'महाराष्ट्र विकास आघाडी' म्हणून आघाडी स्थापन करण्याचा ठराव एकनाथ शिंदे यांनी मांडला.  'महाराष्ट्र विकास आघाडी' म्हणून आघाडीच्या नावाला राजू शेट्टी, अबू आझमी, बच्चू कडू, कपिल पाटील यांनी अनुमोदन दिलं.

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget