Uddhav Thackeray on Eknath Shinde: तुमच्या शपथेचा आदर, पण आता पर्याय सांगा, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha reservatipm) छत्रपती शिवरायांची शपथ घेतली, त्याचा आदर आहे. पण केवळ भावनिक होऊन उपयोग नाही, पर्याय सुद्धा सांगावा, असं ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha reservatipm) छत्रपती शिवरायांची शपथ घेतली, त्याचा आदर आहे. पण केवळ भावनिक होऊन उपयोग नाही, पर्याय सुद्धा सांगावा, असं ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, (Ajit Pawar) कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष चंगेज खान (Changej Khan) यांनी ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थिवर भाष्य केलं.
जे आऊट गोइंग आहे ते कशासाठी बाहेर चाललेत ते दिसतंय. इनकमिंग सत्ता आणण्याच्या दिशेने होत आहे. आऊट गोइंग सत्तेत जाण्यासाठी झालं आहे. लढवय्या माणसं माझ्यासोबत येत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठा आरक्षणावर भाष्य
यावेळी उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. उद्धव ठाकरे म्हणाले, "मी त्यावर बोललो आहे. खूप त्यावर बोलून गोंधळ घालू नये. नेमकेपणाने बोलून मराठा समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे. धनगर, आदिवासी यांना सगळ्याला विश्वास घेऊन निर्णय घ्यावा. लोकसभेत विशेष अधिवेशन घेऊन या सगळ्याचा सर्व समावेशक निर्णय घ्यावा"
मुख्यमंत्र्यांनी शपथ घ्यावी, पण पर्यायही सांगावा
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी शपथ घ्यावी पण पर्याय सुद्धा सांगावा. शपथ घेऊन भावनिक केलं जातं. शपथेचा आदर आहे, पण मार्ग काय?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
मोदींनी जरांगेंची भेट घ्यावी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात आहेत. त्यांचं स्वागत आहे. मोदींनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा ही विनंती आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
भर मंचावर मुख्यमंत्र्यांकडून शिवरायांची शपथ
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात भर मंचावर भाषण थांबवून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन, मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं होतं. "मी मराठा समाजाचा आहे, आयुष्यभर समाजासाठी राबलोय, मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देणार असं आश्वासन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलं. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे, तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन त्यांनी केलं".