एक्स्प्लोर

Uddhav Thackeray VIDEO : सुरक्षारक्षकांना अडवल्यावर उद्धव ठाकरे पोलिसांवर भडकले; म्हणाले, कोण रे तो? नाव लिहून घ्या त्याचं

Uddhav Thackeray VIDEO : महाविकास आघाडीच्या सभेच्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सुरक्षारक्षकांना अडवल्याने उद्धव ठाकरे पोलिसांवर चांगलेच भडकले.

मुंबई : सर्वसाधारणपणे संयमी स्वभाव, कधीही न रागावणारे अशी ओळख असलेले उद्धव ठाकरे मात्र चांगलेच भडकल्याचं दिसून आलं. बीकेसीमधील महाविकास आघाडीच्या सभास्थळी पोहोचल्यानंतर सुरक्षारक्षकांना मुंबई पोलिसांनी अडवल्यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच भडकले. आत घ्या सगळ्यांना पहिला, कोण आहे तो त्याचं नाव घ्या असं म्हणत उद्धव ठाकरे पोलिसांवर चांगलेच भडकल्याचं दिसून आलं. शेवटी एका पोलिस अधिकाऱ्याच्या विनंतीनंतर उद्धव ठाकरे सभेच्या ठिकाणी निघून गेले. 

Uddhav Thackeray VIDEO : उद्धव ठाकरे भडकले, नेमकं काय घडलं? 

मुंबईतील बीकेसीमध्ये महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्या सभेसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, नाना पटोले आणि इतर नेते उपस्थित होते. सभेच्या ठिकाणी उद्धव ठाकरे काहीसे उशीला पोहोचले. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेही होते. 

बीकेसीच्या सभास्थळी जाताना बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी उद्धव ठाकरेंच्या सुरक्षारक्षकांना अडवले, त्यांना आत प्रवेश देण्यास नकार दिला. त्यामुळे पुढे निघून गेलेले उद्धव ठाकरे पोलिसांवर चांगलेच भडकले. सुरक्षारक्षकांना पहिला आत घ्या असं सांगत उद्धव ठाकरे चांगलेच भडकले. त्यावर एका पोलिस अधिकाऱ्याने संबंधित पोलिसांना सांगतो असं म्हटल्याचं ऐकू येतंय. 

कोण आहे तो? नाव घ्या त्याचं लिहून

उद्धव ठाकरेंच्या सुरक्षारक्षकांना अडवल्यानंतर त्या ठिकाणी गोंधळ झाला. उद्धव ठाकरे पोलिसांना उद्देशून म्हणाले की, कोण आहे तो? त्याचं नाव घेऊन ठेवा. उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यानेही यावेळी नाराजी व्यक्त केली. 'गवळी, तुम्ही सगळ्यांना त्रास देताय' असं त्या कार्यकर्त्याने पोलिसांना उद्देशून वक्तव्य केलं. 

नेहमी भाषणात आक्रमक भूमिका घेणारे उद्धव ठाकरे इतर वेळी मात्र संयमी भूमिका घेताना दिसून येतात. सुरक्षारक्षकांना अडवल्यानंतर मात्र उद्धव ठाकरे पोलिसांवर चांगलेच भडकल्याचं दिसून आलं. उद्धव ठाकरेंना भडकल्याचं पाहून त्यांच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये मात्र शांतता पसरल्याचं दिसून आलं. 

उद्धव ठाकरेंची महायुतीवर घणाघाती टीका

महाविकास आघाडीच्या सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार टीका केली. निवडणुकीनंतर एक तरुण बेरोजगार होणार आहे असं ते म्हणाले. देवेंद्र फडणवीसांवरही त्यांनी जहरी टीका केली. 

ही बातमी वाचा: 

                        

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget