एक्स्प्लोर

गाईला जपायचं अन् ताईला झोडायचं, हे कसलं हिंदुत्त्व? : उद्धव ठाकरे

मुंबईत शिवतीर्थावर दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील कालच्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे उद्धव ठाकरेंनी भाषणाआधी हार स्वीकारले नाहीत. त्यांनी थेट भाषणाला सुरुवात केली आणि भाजपला धारेवर धरलं.

मुंबई : आमचं हिंदुत्त्व तुमच्यासारखं थोतांड नाही. गाईला जपायचं अन् ताईला फोडायचं, असं म्हणत दसरा मेळाव्यातील भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर चौफेर टीका केली. नोटाबंदी, जीएसटी, काश्मीर प्रश्न, बुलेट ट्रेन, हिंदुत्त्व इत्यादी मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसह केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्ला केला. मुंबईत शिवतीर्थावर दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील कालच्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे उद्धव ठाकरेंनी भाषणाआधी हार स्वीकारले नाहीत. त्यांनी थेट भाषणाला सुरुवात केली आणि भाजपला धारेवर धरलं. नोटबंदीचा निर्णय घेऊन देशाचं नुकसान करणारे देशद्रोही नाहीत का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. तर पाकिस्तानप्रमाणे 40 ते 45 रुपयांत पेट्रोल विकलं तर मोदींना डोक्यावर घेऊन नाचू, असा टोमणा देखील उद्धव ठाकरेंनी मारला. “आम्हाला शेंडी, जानव्याचं हिंदुत्त्व मान्य नाही. आम्हाला मंदिरात घंटा बडवणारं हिंदुत्त्व मान्य नाही. आमचं हिंदुत्त्व देशाशी निगडीत आहे.”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला हिंदुत्त्वाची व्याख्या स्पष्ट करण्याचं आव्हान दिलं आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेवरुन रेल्वेमंत्र्यांवर निशाणा “रेल्वेमंत्री आता बोलायला लागलेत की, पूल प्रशस्त होणार आहेत. हे तुम्हाला आज सुचलं? जिथे जिथे गर्दी होते, तिथले पूल, जिने रुंद करण्यासाठी आपल्याला अक्कल येणार आहे की नाही? एखादी दुर्घटना घडली की, उच्च समिती नेमतात. पण त्या अधिकाऱ्यांना म्हणावं, समिती नेमू नका. तुम्ही त्या जिन्यावरून उतरून दाखवा”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी रेल्वेमंत्र्यांवर निशाणा साधला. बुलेट ट्रेनला विरोध “कुणी मागितली बुलेट ट्रेन? मग हा सगळा खटाटोप कोणासाठी? तमाम माता-भगिनींच्या स्वप्नांचा चुराडा करून तुम्ही चांगली स्वप्न बघता. फुकट नागोबा कशाला हा? हे सगळं फुकट मिळतं म्हणून हे चाळे सुरू आहेत. ज्या जनतेने निवडून दिले त्यांच्या अपेक्षा पूर्ण करा.”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी बुलेट ट्रेनचा विरोध केला.

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई,  हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातून 22 वर्षीय महिला आरोपीला अटक 
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई,  हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातून 22 वर्षीय महिला आरोपीला अटक 
पक्षात कुठेही नाराजी नाही, दिल्लीतील बैठक नियोजित, सुनिल तटकरेंनी दिली महत्वाची माहिती, आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
पक्षात कुठेही नाराजी नाही, दिल्लीतील बैठक नियोजित, सुनिल तटकरेंनी दिली महत्वाची माहिती, आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: कोयना धरणाच्या पाण्यावरून सातारा-सांगलीत राजकारण तापलं! राजू शेट्टींच्या टीकेला पालकमंत्र्यांचं उत्तर!
Maharashtra Live blog updates: कोयना धरणाच्या पाण्यावरून सातारा-सांगलीत राजकारण तापलं! राजू शेट्टींच्या टीकेला पालकमंत्र्यांचं उत्तर!
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
Embed widget