(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dombivali News : डोंबिवलीच्या सिद्धार्थ नगरमध्ये रेल्वेची संरक्षक भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू, तर तीनजण जखमी
Two labourers Died in Dombivali : डोंबिवली पश्चिमेत रेल्वेच्या नव्या संरक्षक भिंतीचं काम सुरू असताना तिथेच असलेली जुनी संरक्षक भिंत कोसळल्याने त्याठिकाणी काम करणारे पाच मजूर गंभीर जखमी झाले असून दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
Dombivali Railway Protection wall collapsesed : डोंबिवली (Dombivali) पश्चिमेकडील सिद्धार्थनगर झोपडपट्टी परिसरात भिंतींच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान अपघातात दोन कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला असून तिघेजण जखमी झाले आहेत. याठिकाणी असलेल्या रेल्वेच्या नव्या संरक्षक भिंतीचं काम सुरू असतानाच शेजारी खेटून असलेली जुनी संरक्षक भिंत कोसळल्याने दुर्घटनेत त्या ठिकाणी काम करणारे पाच मजूर गंभीर जखमी झाले. यामधील दोन मजुरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या कामगारांना तातडीने जवळच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील सिद्धार्थनगर येथे रेल्वेच्या संरक्षण भिंतीच काम सुरू आहे. आज (21 सप्टेंबर) दुपारच्या सुमारास हे काम सुरू असताना या भिंतीला खेटून असलेली जुनी भिंत अचानक कोसळली. या दुर्घटनेत त्याठिकाणी काम करत असलेले पाच मजूर गंभीर जखमी झाले. भिंत अंगावर कोसळल्याने हे मजूर ढीगाऱ्याखाली गाडले गेले होते. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केलं. अग्निशमन विभागाला याबाबत माहिती देखील देण्यात आली. अग्निशामन विभागाने तत्काळ या ठिकाणी धाव घेतली पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाचही जणांना जवळच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
दोघांचा मृत्यू तर तीनजण गंभीर जखमी
रुग्णालयाच दाखल केल्यानंतर यामधील गंभीर जखमी झालेल्या मल्लेश चव्हाण आणि बंडू कुवासे या दोन मजुरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. माणिक पवार, विनायक चौधरी, युवराज वेडगुत्तवार या तीन मजुरांवर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी जखमींच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवण्याचा काम सुरू असून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे डोंबिवलीचे एसीपी सुनील कुऱ्हाडे यांनी सांगितले.
हे देखील वाचा -