HSC Results | बारावीच्या निकालात जुळ्या बहिणीचं घवघवीत यश; मार्कांची परंपरा कायम
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात नालासोपारा येथील जुळ्या बहिणीचं घवघवीत यश मिळवलंय.
नालासोपारा : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर (Maharashtra HSC Results 2020 Declared) झाला. या निकालात यंदाही मुलींनीही बाजी मारली आहे. नालासोपारा येथील शालांत परीक्षेत 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उज्वल यश मिळवलेल्या जुळ्या बहिणींनी बारावीत पुन्हा एकदा घवघवीत यश मिळवत स्वचःला सिद्ध केलंय. त्या दोघींनाही 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवून पुन्हा एकदा प्रगतीची भरारी घेतली आहे.
नालासोपारा पश्चिमेच्या सोपारा गावात राहणाऱ्या आकांशा आणि अक्षता या ठाकूर बहिणींनी हे यश मिळवले आहे. नाना पाटील होली क्रॉस शाळेत शिकत असताना 2018 च्या शालांत परीक्षेत अक्षताने 94.80 टक्के गुण मिळवले होते तर आकांशाने 94.20 टक्के गुण मिळवले होते.
यंदाच्या बारावी परीक्षेत वर्तक कॉलेजच्या विज्ञान शाखेतून परीक्षा देताना आकांशाने 92.92 टक्के तर अक्षताने 90.76% गुण मिळवले आहेत.आकांशाने गणितात शंभरपैकी शंभर गुण मिळवून आपण अव्वल असल्याचे दाखवून दिले आहे. वसईतील अण्णा साहेब वर्तक महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थीनी असलेल्या आकांक्षा व अक्षता ह्या जुळ्या बहिणींनी नव्वदी पार टक्के मिळवत यश संपादन केले आहे. आर्किटेक्ट व्हायची इच्छा आकांक्षाने व्यक्त केली आहे. तर अक्षताला बीएससी करून युपीएससी (UPSC) चा मार्ग निवडायचा आहे.
निकालात मुलींचीच बाजी राज्याचा बारावीचा निकाल 90.66 टक्के लागला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 4.78 टक्क्यांनी वाढला आहे. मागील वर्षी हा निकाल 85.88 टक्के लागला होता. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 93.88 टक्के असून विद्यार्थ्यांचा निकाल 88.04 टक्के आहे. म्हणजेच विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 5.84 टक्क्यांनी जास्त आहे. कोकण विभाग टॉपवर तर औरंगाबाद सर्वात कमी
सर्व विभागीय मंडळांमधून नियमित विद्यार्थ्यांमध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक 95.89 टक्के निकाल असून सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा (88.18 टक्के) आहे.
Maharashtra HSC Results 2020 | बारावीच्या निकालाची विभागवार आकडेवारी