एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तुकाराम मुंढेंचा नवी मुंबईत धडक कारवाई, 6 कामचुकार अधिकाऱ्यांचं निलंबन
नवी मुंबई : एक कर्तव्यदक्ष आधिकारी काय करू शकतो, याचे उत्तम उदाहरण नवी मुंबईकरांना सध्या पाहायला मिळत आहे. आजपर्यंत नवी मुंबईतील फुटपाथने फेरीवाल्यांच्या विळख्यामुळे कधी मोकळा श्वास घेतला नव्हता. मात्र आता आयुक्तपदी आलेल्या तुकाराम मुंढे यांच्या नावानेच फेरीवाले दिसेनासे झाले आहेत . तर दुसरीकडे कामात कुचराई करणाऱ्या 6 वरिष्ठ अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.
शहराचा विकास करणे आणि त्याचा चेहरा आबाधीत ठेवणे तेथील स्थानिक स्वराज्य संख्येतील प्रशासनाचे आणि सत्ताधारी पक्षाचे काम असते. नेमकं हेच काम दोन्ही घटक सोईस्करित्या विसरत असल्याने शहराला बकाल पणाचे स्वरूप प्राप्त होते. हीच स्थिती नवी मुंबईचीही झाली होती.
शहरात सगळीकडे फेरीवाल्यांनी उच्छांद मांडला होता. नुकतेच पालिकेत रूजू झालेल्या आयुक्त तुकाराम मुंढेंनी आल्या-आल्या फेरीवाल्यांचा बंदोबस्त केला आहे. शहरातील सर्व फुटपाथवरील फेरीवाल्यांवर कारवाई करून फुटपाथ मोकळे केले आहेत.
तर दुसरीकडे कामचुकार, भष्ट आधिकाऱ्यांवर कारवाई करीत 6 वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. 38 जणांचा एक दिवसाचा पगार कापला आहे. 2 जणांची वेतनवाढ थांबविली.
निलंबन केलेले आधिकारी -
- साहेबराव गायकवाड - सहा. आयुक्त
- बाळकृष्ण पाटील - सहा. आयुक्त
- बाळा पाटील - अधिक्षक
- सुभाष सोनवणे - सहाय्यक लेखा अधिकारी.
- प्रकाश कुलकर्णी - मालमत्ता विभाग प्रमुख .
- विरेंद्र पवार- उपस्वच्छता निरिक्षक.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
करमणूक
निवडणूक
Advertisement