एक्स्प्लोर
तुकाराम मुंढेंकडून मंदा म्हात्रे, महापौरांना चहापानाचं निमंत्रण
नवी मुंबईः नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आमदार मंदा म्हात्रे आणि महापौर सुधाकर सोनवणे यांना चहापानासाठी निमंत्रण दिलं. गेल्या काही दिवसांपासूच्या वादावर पडदा टाकत मुंढेंनीच पुढाकार घेत नवी मुंबईच्या विकासावर चर्चा केली.
आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यापासून मुंढे आणि भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे आणि महापौर सुधाकर सोनावणे यांच्यात वाद निर्माण झाला होता. यामुळे महापौरांनी महापालिकेची पायरी न चढण्याचा निर्णय घेतला.
कुणासोबतही वैयक्तिक वाद नाहीः तुकाराम मुंढे
महापौर येत्या दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. तर आमदार म्हात्रे यांनी मुंढेंच्या भूमिकेचं स्वागत केलं. मात्र आपण दिव्यांग मुलांच्या ईटीसी केंद्राच्या भ्रष्टाचाराबाबत कोणतीही तडजोड करणार नसल्याचं म्हटलं.
आयुक्त मुंढेंनी आपला कोणा एका व्यक्ती सोबत द्वेश नव्हता. तर विकासाचा दृष्टीकोन होता. मात्र गेला वाद संपवत या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असं सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement