एक्स्प्लोर
युतीसाठी उद्धव आणि मुख्यमंत्र्यांमध्ये गुप्त ठिकाणी बैठक होणार: सूत्र
![युतीसाठी उद्धव आणि मुख्यमंत्र्यांमध्ये गुप्त ठिकाणी बैठक होणार: सूत्र Tomorrow Uddhav Thackeray And Cm Fadnavis Meeting For Alliance युतीसाठी उद्धव आणि मुख्यमंत्र्यांमध्ये गुप्त ठिकाणी बैठक होणार: सूत्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/24145448/cm-and-uddhav-compressed-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: मुंबईतील युतीबद्दल अजूनही धुकधुकी कायम आहे. कारण जागा वाटपावरुन पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. उद्या एका गुप्त ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून समजते आहे.
मुंबईत युतीचं घोडं अडलेलं असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. नीती आयोगाच्या बैठकीच्या निमित्तानं फडणवीस दिल्लीत गेले होते. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत युतीसंदर्भात चर्चा झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यामुळे युतीचं भवितव्य पुढच्या 24 तासात ठरण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री मुंबईत परतल्यानंतर उद्या त्यांची युतीबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा होणार असल्याची माहिती समजते आहे. दरम्यान, या चर्चेत भाजपकडून नवा आकडा येण्याची शक्यता आहे. एकीकडे अशीही चर्चा आहे की, शिवसेना भाजपसाठी 90 जागा सोडू शकतं. त्यामुळे आता नेमका काय प्रस्ताव येतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, शिवसेनेची नेमकी काय भूमिका असणार हे 26 जानेवारीला आपण जाहीर करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी काल स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता 26 तारखेआधी युतीचा निकाल लागू शकतो. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्यानं अजूनही युतीची आशा कायम आहे.
संबंधित बातम्या:
शिवसेनेची 227 जणांची यादी तयार, 'मातोश्री'वर तातडीची बैठक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
भारत
सातारा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)