एक्स्प्लोर

Tokyo Paralympics 2021 : रौप्यपदक विजेत्या भाविनाबेन पटेलला एमजी मोटर करणार स्पेशल कार गिफ्ट करणार

परालिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या नेमबाज अवनी लेखरा (Avani Lekhara) आणि भालाफेकपटू सुमित अंतिल (Sumit ANtil) यांना उद्योगपती आनंद महिद्रा यांना खास भेट जाहीर केली आहे.

मुंबई : टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिस क्लास 4 स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिली खेळाडू ठरली आहे. स्त्रियांची ताकद आणि दृढनिश्चयाची दखल घेत ब्रिटिश कार निर्माता एमजी मोटर इंडियाने भाविना पटेलच्या ऐतिहासिक कामगिरीला सलाम केला आहे. एमजी मोटर इंडिया स्पेशली कस्टमाइज्ड एमजी एसयूव्ही भेट देऊन चमकदार कामगिरीबद्दल भाविनाचा सन्मान करणार आहे.   

भाविनाच्या या मोठ्या विजयाबद्दल अभिनंदन करताना एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा यांनी ट्वीट केले की, विजयी पताका घेऊन परतणाऱ्या भाविनाबेनला एमजी कार भेट देणे हा आमचा सन्मान आणि बहुमान असेल.

भारतात प्रवेश केल्यापासून आणि हलोल येथे आपलं उत्पादन सुरू केल्यापासून एमजी मोटर वडोदरा मॅरेथॉनचे प्रायोजक आहे. वडोदरा मॅरेथॉन इतर मॅरेथॉनपेक्षा वेगळी आहे कारण ती नेहमीच विविध सामाजिक उपक्रमात प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित केली जाते, ज्यात 'दिव्यांग रन' नावाच्या शर्यतीचा सहभाग आहे.

एमजी मोटरने पॅरालिम्पिक ॲथलीट आणि खेलरत्न पुरस्कार प्राप्त डॉ. दीपा मलिक यांच्या आवाजाने आपल्या वैयक्तिक एआय सहाय्यकाला देण्याची घोषणा केली आहे. हा प्रयत्न एमजी ब्रँडचे उत्साही आणि आगामी एसयूव्ही अॅस्टरच्या संभाव्य मालकांना अनोखा अनुभव देईल. ऑटोमोटिव्ह ब्रँड असल्याने एमजीने केवळ ऑटोमोटिव्ह क्षेत्रावरच लक्ष केंद्रित केले नाही तर समाजातील महत्त्वाच्या घटकांच्या सक्षमीकरणासाठी सक्रियपणे काम केले आहे.

आनंद महिंद्रांकडून अवनी लेखरा आणि सुमित अंतिल यांना खास गिफ्ट

परालिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या नेमबाज अवनी लेखरा आणि भालाफेकपटू सुमित अंतिल यांना उद्योगपती आनंद महिद्रा यांना खास भेट जाहीर केली आहे. 10 मीटर एयर स्टँडिंग प्रकारात सुवर्ण पदक जिंकणाऱ्या अवनीला आनंद महिंद्रांनी दिव्यांगांसाठी बनलेली पहिली SUV गिफ्ट देण्याची घोषणा ट्विटरद्वारे दिली आहे. काही दिवसांपूर्वी दीपा मलिकने आनंद महिंद्रांना दिव्यांगांसाठी SUV बनवण्याचा सल्ला दिला होता. आता ती एसयूव्ही तयार झाली असून ती पहिली एसयूव्ही अवनीला गिफ्ट करणार असल्याचं आनंद महिंद्रा यांनी सांगितलं आहे. 

तर सुमित अंतिलने भालाफेकमध्ये विश्वविक्रमी कारगिरी करत सुवर्ण पदक पटकावलं. त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी सुमित महिंद्राची XUV 700 गिफ्ट देणार असल्याची घोषणा केली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
Pune Crime: पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde Majha Vision|संतोष देशमुख, धनूभाऊंचा राजीनामा,माझा व्हिजनवर पंकजा मुंडे भरभरून बोलल्याAjit Pawar Majha Vision: धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजनSpecial Report Jaykumar Gorhe : जयकुमार गोरेवर गंभीर आरोप, आता खंडणीसाठी अटक नेमकं प्रकरण काय?Imtiaz Jaleel Majha Vision| नागपूर दंगल ते औरंगजेब, माझा व्हिजनमध्ये जलीलांचा भाजप, आझमींवर निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
Pune Crime: पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
Embed widget