एक्स्प्लोर
मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक
मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे दरम्यान आज रविवार 17 सप्टेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावरील सीएसटी ते चुनाभट्टीदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने, या मार्गावरील काही उपनगरीय गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे दरम्यान आज रविवार 17 सप्टेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावरील सीएसटी ते चुनाभट्टीदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने, या मार्गावरील काही उपनगरीय गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेवर कल्याण-ठाणे अप-डाऊन मार्गावर सकाळी 11.15 ते संध्याकाळी 4.15 वाजेदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मेगाब्लॉक काळात मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कल्याण-ठाणे दरम्यान धिम्यागतीच्या सर्व लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.
या लोकलना ठाकुर्ली, कोपर, दिवा, मुंब्रा, कळवा स्टेशनदरम्यान थांबा देण्यात येणार नाही. त्यामुळे या प्रवाशांना ठाणे किंवा डोंबिवलीला उतरुन उलटा प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टीदरम्यान सकाळी 11.15 ते संध्याकाळी साडेचारवाजेपर्यंत लोकल सेवा खंडित करण्यात येणार आहे.
त्यामुळे सीएसटी ते पनवेल, वाशी, बेलापूर दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच सीएसटीहून वांद्रेकडे जाणाऱ्या लोकल फेऱ्याही याकाळात रद्द करण्यात आल्या आहेत.
या मेगाब्लॉक काळात पनवेल, बेलापूर आणि वाशीकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी कुर्ला स्थानकातून विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहे.
तर हार्बर मार्गावरील सीएसटी ते वांद्रे स्थानकादरम्यानही लोकल बंद राहणार असल्याने, या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दादर मार्गे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement