एक्स्प्लोर
यंदा चिंता नाही, मुंबईकरांसमोरील पाणीकपातीचं संकट टळलं!
मुंबई : दरवर्षी मे महिन्यात पाणीकपातीचा सामना करणाऱ्या मुंबईला यंदा मात्र कोणत्याही कपातीला सामोरं जावं लागणार नाही. कारण पावसाळा तोंडावर असतानाही मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये तब्बल 98 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आहे.
मोडकसागर, तानसा, विहार, तुलसी, भातसा आणि मध्य वैतरणा या तलावातून मुंबईकरांना दरदिवशी 3750 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो.
गेल्या वर्षी झालेला बक्कळ पाऊस आणि वैतरणा जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे पाणीसाठा मुबलक आहे. इतकंच नाही, तर मुंबईच्या पाणी पुरवठ्यातही यंदा वाढ झाली आहे. त्यामुळे पाणी कपात न करता पाणीपुरवठ्याचं नियोजन करणं महापालिकेला शक्य झालं आङे.
सद्यस्थितीत तलावांमध्ये 3 लाख 67 हजार 991 दशलश लिटर पाणीसाठा आहे. तीन महिने मुंबईची तहान भागेल, एवढा जलसाठा असल्याने जुलैपर्यंत पाण्याची चिंता नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement