एक्स्प्लोर
भिवंडीत चोरांची दहशत, मोबाईल पळवून युवकावर गोळीबार
भिवंडी शहर व ग्रामीण भागात लूटमारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तालुक्यातील भादवड परिसरातील तरे कंपाऊंडमध्ये लूटमारीच्या इराद्याने आलेल्या चोरांनी एका युवकावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.
मुंबई : भिवंडी शहर व ग्रामीण भागात लूटमारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तालुक्यातील भादवड परिसरातील तरे कंपाऊंडमध्ये लूटमारीच्या इराद्याने आलेल्या चोरांनी एका युवकावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.
चोरांनी युवकावर तीन वेळा गोळीबार केला. या गोळीबारात युवाकाला दोन गोळ्या लागल्या असून तो गंभीर जखमी झाला आहे. कामाक्षा प्रसाद साहू (30) असे जखमी झालेल्या युवकाचा नाव आहे. स्थानिकांनी उपचारासाठी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. भिवंडीजवळ्च्या खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले जात आहेत.
कामाक्षा हा युवक भिवंडी तालुक्यातील भादवड येथील तरे कंपाऊंड येथे एका मित्राला भेटायला जात होता. त्यावेळी एका मोटरसायकलवरून तीन चोरटे त्या ठिकाणी आले. चोरट्यांनी कामाक्षाला रस्त्यात अडवून त्याच्या जवळ असलेला मोबाइल हिसकावून घेतला आणि त्याच्या खिशातील पैशाचे पाकीटही काढून घेतले.
खिशातील पैशाचे पाकिट हिसकावल्यानंतर कामाक्षाने चोरट्यांना विरोध करायला सुरुवात केली. पाच ते दहा मिनिटे त्यांच्यात बाचाबाचीही झाली. ही बाचाबाची झटापटीत बदलली. त्याचवेळी एका चोरट्याने कामाक्षाला धक्का देऊन जमिनीवर पाडले आणि तिथून पळ काढू लागले. परंतु युवकाने मोठ्या धाडसाने या चोरट्यांचा पाठलाग करून एका चोरट्याला पकडून ठेवले होते.
आपल्या साथीदाराला पकडून ठेवल्याने दुसऱ्या चोरट्याने त्याच्याजवळची बंदूक काढून युवकावर तीन गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या युवकाच्या मांडीत लागल्या, त्यामुळे तो जमिनीवर कोसळला. गोळीच्या आवाजाने स्थानिकांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिकांनी लगेच त्या युवकाला भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच भिवंडी तालुका पोलिसांना याची माहिती दिली. याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस या चोरांचा तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement