एक्स्प्लोर

ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडले, खा. शिंदेंना हायकोर्टाने पुन्हा झापले

जनहित लक्षात घेऊन खासदारांनी स्वत:हून ध्वनी प्रदूषणाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करायला हवी. मात्र, तेच नियमांचा भंग करत असतील तर कसे चालेल? असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केला आहे.

मुंबई : ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडल्याबद्दल बिनशर्त माफी मागितल्यानंतरही शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा तेच नियम पायदळी तुडवल्याची बाब हायकोर्टाच्या समोर आली आहे. फेब्रुवारी-2018  मध्ये अंबरनाथमध्ये आयोजित केलेल्या शिवमंदिर महोत्सवात तसेच डोंबिवलीत ऑक्टोबर-2018 मध्ये आयोजित केलेल्या दांडिया महोत्सवातही पुन्हा नियमांचे व आदेशांचे उल्लंघन झाल्याचे जनहित याचिकादारांनी बुधवारी दाखवून दिले. त्यामुळे उच्च न्यायालयाने याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. ध्वनी प्रदूषणप्रश्नी खुद्द सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत आणि ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणामही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहेत. त्यामुळे जनहित लक्षात घेऊन खासदारांनी स्वत:हून ध्वनी प्रदूषणाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करायला हवी. मात्र, तेच नियमांचा भंग करत असतील तर कसे चालेल? असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केला आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यापुढे ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळण्यासोबत लोकांमध्ये ध्वनी प्रदूषणाच्या नियमांबद्दल जनजागृती करण्यासाठी काय उपाययोजना करणार आहेत? त्याची माहिती सादर करा, असे निर्देश बुधवारी मुंबई उच्च न्यायालयानं श्रीकांच शिंदे यांना दिले आहेत. साल 2017 मध्ये अंबरनाथमधील एका धार्मिक उत्सवाच्या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करून ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं शिवसेनेचे कल्याण डोंबिवली येथील खासदार श्रीकांत शिंदे यांना फटकारले होते. हायकोर्टाचे आदेश माहिती असतानाही त्याचं उल्लंघन केल्याबद्दल कोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या धार्मिक कार्यक्रमात रात्री 10 वाजताची वेळ उलटून गेल्यानंतरही लाऊडस्पीकरचा वापर करण्यात आला होता. मात्र हायकोर्टाच्या निर्देशांनुसार झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागून पुन्हा नियमांचे उल्लंघन करणार नाही, अशी लेखी हमी श्रीकांत शिंदे यांनी हायकोर्टात दिली होती. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी जे या कार्यक्रमाचे आयोजक होते त्यांच्याऐवजी भलत्याच लोकांची नावं आयोजक म्हणून दिल्याबद्दल पोलिसांनाही फटकारून काढलं होतं. हिराली फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान हायकोर्टाने हे ताशेरे ओढले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
Numerology : प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 11 PM 07 October 2024Zero Hour : 40 हजार कोटींची बिलं थकली, कंत्राटदारांवर आंदोलनाची वेळZero Hour Nagpur : बौद्ध लेणींच्या बचावासाठी एकवटले संभाजीनगरकरABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 9 PM 07 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
Numerology : प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
Vastu Tips : रोजच्या जीवनातील 'या' 10 चुका आताच टाळा; गरिबीला मिळेल आमंत्रण, घरात टिकणार नाही पैसा
रोजच्या जीवनातील 'या' 10 चुका आताच टाळा; गरिबीला मिळेल आमंत्रण, घरात टिकणार नाही पैसा
Bopdev Ghat Incident : आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
Guru Vakri 2024 : तब्बल 12 वर्षांनंतर नवरात्रीत गुरु ग्रह वक्री; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
तब्बल 12 वर्षांनंतर नवरात्रीत गुरु ग्रह वक्री; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Embed widget