एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने विकासकामेही रखडली

Cabinet Expansion : राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला 25 दिवस झाले. मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे राज्यातील अनेक विकासकामं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अडकलेले आहेत.

Maharashtra Cabinet Expansion : राजभवनाच्या (Raj Bhavan) दरबार हॉलमध्ये  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्या शपथविधीचा सोहळा पार पडून आज पंचवीस दिवस पूर्ण होत आहेत. राज्याला फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. पण मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पंचवीस दिवसांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनेक तारखा समोर आल्या मात्र अद्याप विस्तार होऊ शकलेला नाही. त्यामुळे राज्यातील विकासकामांवर आणि जनतेच्या कामावर परिणाम होताना पाहायला मिळत आहे.

अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे राज्यातील अनेक विकासकामे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अडकलेले पाहायला मिळत आहेत. जर कोणता निर्णय घ्यायचा असेल तर अंतिम निर्णयासाठी मंत्री नसल्याने मुख्यमंत्र्याकडे फाईल पाठवायलाही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होऊन प्रत्येक विभागाला मंत्री कधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

मागील पंधरा दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जवळपास आठ लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झालं आहे तर चार हजार हेक्टर जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. याच बळीराजाला संकटातून बाहेर काढण्यासाठी 25 दिवसापासून राज्याला कृषिमंत्री देखील नाही.

मुख्यमंत्री जरी हे सर्व विभागांचे मुख्य असले किंवा त्यांना प्रत्येक विभागात लक्ष घालण्याचाअधिकार असला तरी रोज होणार्‍या कामांचा आढावा घेणे मुख्यमंत्र्यांना शक्य नाही. प्रशासनाने तयार केलेल्या फाईलवर प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्यांना सही करणेही शक्य नाही. त्यामुळे प्रशासनाने घेतलेले अनेक निर्णय तसेच कागदोपत्री राहण्याची शक्यता दाट असते.

बळीराजा संकटात आहे. विद्यार्थ्यांचं शालेय वर्ष सुरु झालं आहे परंतु शिक्षण मंत्री नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रमाणे विद्यार्थ्यांचे प्रश्नही प्रलंबित आहेत. सगळ्याच स्तरातील लोकांचे प्रश्न प्रलंबित आहे आणि याच सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी अधिवेशन हे सर्वात मोठं हत्यार आहे. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ न शकल्यामुळेअधिवेशनही पुढे ढकलण्यात आलं आहे. त्यामुळे सध्यातरी या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडायचे कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Samadhan Sarvankar On Shivsena UBT Vishakha Raut: व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
BMC Fellowship Programme: 61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, BMC फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद
61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; अवघ्या 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, महापालिका फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
Embed widget