एक्स्प्लोर
उपचारांऐवजी जीआरपींनी पुढच्या ट्रेनमध्ये टाकलं, प्रवाशाचा मृत्यू
थेट दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 जुलैला दुपारी सफाई कर्मचाऱ्याला ट्रेनमध्ये तो तरुण आढळला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.
नवी मुंबई : ट्रेनमधून स्टेशनवर पडून गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाच्या बाबतीत जीआरपींनी अत्यंत
असंवेदनशीलता दाखवल्याचं समोर आलं आहे. जीआरपी कॉन्स्टेबल आणि होमगार्डने त्याच्यावर उपचार करण्याच्या भानगडीत न पडता त्याला पुढच्या ट्रेनमधे ढकलून दिलं. त्यामुळे उपचाराअभावी तरुणाचा मृत्यू झाला.
नवी मुंबईजवळच्या सानपाडा रेल्वे स्टेशनवर 21 जुलैच्या मध्यरात्री एक वाजता ही घटना घडली. एक व्यक्ती सानपाडा स्टेशनवर धावत्या ट्रेनमधून खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. त्यानंतर एक जीआरपी कॉन्स्टेबल आणि होमगार्ड तिथं दाखल झाले.
जखमी प्रवाशावर उपचार करण्याची संवेदनशीलता दोघांनी दाखवली नाही. उलट त्याला मागोमाग आलेल्या 1.15
वाजताच्या ट्रेनमधे टाकलं. पुढे ती ट्रेन पनवेलमधे यार्डमध्ये गेली.
थेट दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 जुलैला दुपारी सफाई कर्मचाऱ्याला ट्रेनमध्ये तो तरुण आढळला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
होमगार्डला बडतर्फ करण्यात आलं आहे, तर कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं आहे. मध्य रेल्वेने त्यांची नावं जाहीर केलेली नसली तरी चौकशी सुरु करण्यात आली आहे.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement