एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सिद्धिविनायक मंदिर उडवण्याचा संदेश, प्रेयसीच्या बदनामीसाठी प्रियकराचं कृत्य
विवियाना मॉलमध्ये काल (16 जून) दुपारी साडेतीनच्या सुमारास तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील बाथरुममध्ये दादर सिद्धीविनायक मंदिर Boom, असा संदेश लिहिला होता.
ठाणे : ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सिद्धिविनायक मंदिर उडवण्याचं धमकीचं पत्रक सापडलं. प्रेमप्रकरणातील प्रियकराने प्रेयसीच्या बदनामीसाठी हे पत्रक लिहिल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. ठाणे पोलिसांनी आरोपी केतन घोडकेला अटक केली आहे.
विवियाना मॉलमध्ये काल (16 जून) दुपारी साडेतीनच्या सुमारास तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील बाथरुममध्ये दादर सिद्धिविनायक मंदिर Boom, असा संदेश लिहिला होता. तसंच विवियाना मॉलच्या पत्रकावर दोन वेगवेगळे मोबाईल नंबर पेनाने लिहून ते आजूबाजूला पसरवले होते.
Gazva-E-Hind आणि ISIS या दहशतवादी संघटनेने हा संदेश लिहिल्याचा बनाव करण्यात आला होता. यानंतर विवियाना मॉल आणि आजूबाजूच्या परिसरातील सुरक्षाव्यवस्था वाढवली होती. तसंच एटीएसलाही कळवलं होतं.
पत्रकावरील मोबाईल नंबरवरुन मुलीचा शोध घेऊन तिची विचारपूस करण्यात आली. आपली बदनामी व्हावी आणि पोलिसांकडून त्रास व्हावा यासाठी एक्स-बॉयफ्रेण्ड केतन घोडकेने हे कृत्य केल्याचं संशय तरुणीने व्यक्त केला.
यानंतर केतन घोडकेला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली. यानंतर वर्तक पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा क्रमांक 1281/2019, भादविच्या कलम 505 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याची चौकशी सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement