एक्स्प्लोर
ठाण्यात बार मॅनेजरला मारहाण करणारा कॉन्स्टेबल निलंबित
ठाण्यातील कळवा परिसरातील सायबा बार आणि रेस्टॉरंटमध्ये पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण संखेंनी धुडगूस घातला होता. कॅश काऊंटवर बसणाऱ्या व्यक्तीला आणि बार मॅनेजरला संखेंनी बेदम मारहाण केली होती.

ठाणे : ठाण्यात कळव्यामध्ये बार मॅनेजरला मारहाण करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं आहे. बिलाच्या वादावरुन बार मॅनेजरला मारहाण करणारा कॉन्स्टेबल प्रवीण संखेंची बातमी 'एबीपी माझा'ने दाखवल्यानंतर पोलिस विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली. ठाण्यातील कळवा परिसरातील सायबा बार आणि रेस्टॉरंटमध्ये पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण संखेंनी धुडगूस घातला होता. कॅश काऊंटवर बसणाऱ्या व्यक्तीला आणि बार मॅनेजरला संखेंनी बेदम मारहाण केली होती. चार ते पाच दिवसांपूर्वीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. हॉटेल चालक उमेश करकेरा यांनी पोलिस आयुक्तालय, उपायुक्त, एसीपी, कळवा पोलिस ठाणे आणि हॉटेल असोसिएशनकडे तक्रार केली होती. मात्र पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.
CCTV : पोलिस कॉन्स्टेबलचा बारमध्ये धुडगूस, मॅनेजरला मारहाण
दारु आणि जेवणाचे एकूण 2 हजार 200 रुपये बिल झाले होते. वाढीव बिलावर डिस्काऊंट देण्यावरुन वाद झाल्याने संखेंनी मारहाण केल्याचा आरोप आहे. सीसीटीव्हीत प्रवीण संखे आणखी एका कॉन्स्टेबलला मारताना दिसत आहे. तसेच बारच्या बाहेर पडतानाही अरेरावी करताना सीसीटीव्हीत दिसतात.Before You Go
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















