एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अतिवृष्टीसाठी ठाणे मनपा सज्ज, अधिकाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश
शिवाय या अधिकाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.
ठाणे : पुढील तीन दिवस मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टी भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे.
ठाणे महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांच्या पुढील तीन दिवसातल्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहे. शिवाय या अधिकाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तर त्यातून मार्ग काढण्यासाठी अधिकारी वर्ग तातडीने उपलब्ध होणार आहे.
मुंबईत अतिवृष्टीचा इशारा, पालिका अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
शिवाय ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्यात आला असून कुठल्याही भाग काहीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तर त्या भागात तातडीने मदत पोहोचवण्याची तयारी महापालिकेने केली आहे.
तर फायर ब्रिगेडसह इतर सर्व विभागांना सज्ज राहण्याच्या आणि समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement