एक्स्प्लोर
ठाण्यात लिफ्टमध्ये अडकल्याने चिमुरडीने हात गमावला
अर्चनाची चप्पल लिफ्टमध्येच राहिली. ती घेण्यासाठी तिने लिफ्टमध्ये हात घातला. मात्र त्याचवेळी लिफ्टचा दरवाजा बंद झाला.
ठाणे : लिफ्टमध्ये शिरताना किंवा बाहेर पडताना काळजी घेतली नाही, तर काय घडू शकतं याचं उदाहरण ठाण्यात समोर आलं आहे. लिफ्टच्या दरवाजात हात अडकून एका 8 वर्षांच्या मुलीला आपला हात कायमचा गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे.
ठाण्याच्या कासारवडवली भागामध्ये या चिमुरडीचा लिफ्ट अपघात झाला. अर्चना थळे असं या दुर्दैवी मुलीचं नाव आहे.
दोन दिवसांपूर्वी अर्चना शिकवणीसाठी गेली होती. त्यावेळी तळमजल्यावर पडलेलं पेन घेण्यासाठी अर्चना लिफ्टने खाली गेली. परत आल्यानंतर अर्चनाची चप्पल लिफ्टमध्येच राहिली. ती घेण्यासाठी तिने लिफ्टमध्ये हात घातला. मात्र त्याचवेळी लिफ्टचा दरवाजा बंद झाला.
लिफ्टच्या दरवाज्यात हात अडकल्यामुळे अर्चनाचा हात कोपरापासून तुटला. तिला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दरम्यान, लिफ्टमध्ये कर्मचारी नसल्यानेच हा अपघात झाल्याचा आरोप अर्चनाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement