एक्स्प्लोर
ठाण्यात बाळचोर महिलेकडे सापडलेली 6 मुलं तिचीच अपत्यं
बाळ चोरल्यानंतर गुडिया, सोनू, त्यांची मुलगी आणि विजय यांनी ठाणे स्टेशनवरुन पहाटे 4.39 वाजता अंबरनाथ-सीएसएमटी लोकल पकडली.
![ठाण्यात बाळचोर महिलेकडे सापडलेली 6 मुलं तिचीच अपत्यं Thane : DNA tests confirm 6 kids found with child abductor lady are hers latest update ठाण्यात बाळचोर महिलेकडे सापडलेली 6 मुलं तिचीच अपत्यं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/15075058/thane-baby.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे : गेल्या आठवड्यात ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयातून बाळचोरी करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत बेड्या ठोकल्या. त्यावेळी, आरोपी महिलेच्या घरी सापडलेली सहा मुलं तिने पळवून आणल्याचा पोलिसांचा कयास होता, मात्र डीएनए टेस्टमध्ये ती मुलं आरोपी महिलेचीच अपत्य असल्याचं निष्पन्न झालं आहे.
भिवंडी येथील मोहिनी मोहन भुवर याचं पाच तासांचं बाळ ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयातल्या प्रसुती कक्षातून चोरण्यात आलं होतं.
एक महिला बाळाला पळवून नेताना सीसीटीव्हीत कैदही झाली होती.
ठाण्यातील हॉस्पिटलमधून चोरी झालेलं बाळ 24 तासात सापडलं!
बाळचोरी प्रकरणी 35 वर्षीय गुडिया राजभारसोबत 40 वर्षीय पती सोनू आणि विजय श्रीवास्तव नामक व्यक्तीला पोलिसांनी 16 जानेवारीला अटक केली होती. 24 तासांच्या आतच आरोपींचा छडा लावून बाळ त्याच्या आईकडे सुखरुप सोपवण्यात आलं होतं. बाळ चोरल्यानंतर गुडिया, सोनू, त्यांची मुलगी आणि विजय यांनी ठाणे स्टेशनवरुन पहाटे 4.39 वाजता अंबरनाथ-सीएसएमटी लोकल पकडली. ते कुठे उतरले, हे पाहण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजद्वारे सर्व रेल्वे स्थानकं शोधली.CCTV : ठाण्यातील रुग्णालयातून पाच तासांचं बाळ चोरीला!
या चौघांनी बाळासह टिटवाळा लोकल पकडल्याची माहिती सीएसएमटी पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्यांचा मागोवा घेतला, तेव्हा चौघं डोंबिवलीला उतरुन रिक्षाने पिसवली गावात गेल्याचं समजलं. आरोपींना अटक केली त्यावेळी त्यांच्या घरी सहा जण सापडले. मात्र ही पोरंही त्यांनी पळवून आणल्याचं अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)