एक्स्प्लोर

Thane Coronavirus : पुरेसा ऑक्सिजन साठा नसल्याने ठाणे पालिका हॉस्पिटलमधील रुग्णांचे स्थलांतर

ठाणे महापलिकेने कोविड रुग्णांच्या उपचारासाठी ग्लोबल कोविड सेंटर सोबतच पूर्व द्रुतगती महामार्गावर पार्किंग प्लाझा सेंटरची उभारणी केली आहे. अद्ययावत अशा या रुग्णालयात चारशे ते पाचशे कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे. मात्र शनिवारी संध्याकाळी ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा उशीरा येणार असल्याचे डॉक्टरांना समजल्यानंतर महापलिकेची धावपळ सुरु झाली.

ठाणे : ठाण्यात एकीकडे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रुग्णांना ऑक्सिजन मिळणे देखील मुश्किल झाले आहे. ठाण्यातील पार्किंग प्लाझा कोविड हेल्थ सेंटरमध्ये ऑक्सिजनचा साठा संपण्याची भीती वाटू लागल्याने अचानक 26 रुग्णांना ग्लोबल कोविड सेंटर म्हणजेच दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्याची वेळ महापालिकेवर आली होती. एकूणच ऑक्सिजनचा साठा कमी झाल्याने रुग्णालयातील डॉक्टर आणि पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांची धावपळ उडाली होती. ही बाब लवकर समजल्याने मोठा अनर्थ टळला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

ठाणे महापलिकेने कोविड रुग्णांच्या उपचारासाठी ग्लोबल कोविड सेंटर सोबतच पूर्व द्रुतगती महामार्गावर पार्किंग प्लाझा सेंटरची उभारणी केली आहे. अद्ययावत अशा या रुग्णालयात चारशे ते पाचशे कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात अनेक कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे. मात्र शनिवारी संध्याकाळी ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा उशीरा येणार असल्याचे डॉक्टरांना समजल्यानंतर महापलिकेची धावपळ सुरु झाली. उपचार घेत असलेल्या रुग्णांना तातडीने दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले. यावेळी 10 ते 12 रुग्णवाहिका तातडीने बोलावून या रुग्णांना ग्लोबल कोविड सेंटर येथे हलवण्यात आले. गंभीर परिस्थिती उद्भवू नये यासाठी या रुग्णांना हलवले जात असल्याची माहिती महापालिकेने दिली.

ठाण्यात कोविड रुग्णालयात ऑक्सिजनची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर लागत असते. हा ऑक्सिजन पुरवठा तळोजा येथून करण्यात येतो. मात्र तळोजा येथे काही तांत्रिक बिघाड झाल्याने ठाण्याच्या कोविड सेंटरमध्ये उशिरा ऑक्सिजनचा साठा येणार असल्याने कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी कुठलिही बाधा येऊ नये यासाठी रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले, असल्याची माहिती यावेळी अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. 

Remdesivir injection | ठाण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या दोघांना अटक

महाराष्ट्रात 15 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता राज्यात 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. कडक निर्बंध, थोडी सूट असं चालणार नाही. कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनला पर्याय नाही. आज टास्क फोर्ससोबत बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर याबद्दल निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेतली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare: परभणीत कोंबींग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
परभणीत कोंबींग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
Sharad Pawar & Ajit Pawar: अजित पवारांनी शरद पवारांची भेट का घेतली, भाजपला मोठा मेसेज देण्याचा प्रयत्न?
शरद पवारांची भेट घेऊन अजितदादांनी एकदा दगडात अनेक पक्षी मारले , नेमका कोणता पॉलिटिकल मेसेज दिला?
Sharad Pawar : आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
Ajit Pawar meets Sharad Pawar : शरद पवारांना भेटून बाहेर पडल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शरद पवारांना भेटून बाहेर पडल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Birthday :शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते नवी दिल्लीतील निवासस्थानी उपस्थितParbhani Todfod : परभणीतील गाडी तोडफोडीचा धक्कादायक व्हिडीओ समोरKurla Bus Accident Video : निर्लज्जपणाचा कळस, कुर्ला अपघातातील मृत महिलेच्या बांगड्या चोरल्याCabinet Expansion : राज्यमंत्रिमंडळ फाॅर्म्युला फायनल; दिल्लीत शिक्कामोर्तब ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare: परभणीत कोंबींग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
परभणीत कोंबींग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
Sharad Pawar & Ajit Pawar: अजित पवारांनी शरद पवारांची भेट का घेतली, भाजपला मोठा मेसेज देण्याचा प्रयत्न?
शरद पवारांची भेट घेऊन अजितदादांनी एकदा दगडात अनेक पक्षी मारले , नेमका कोणता पॉलिटिकल मेसेज दिला?
Sharad Pawar : आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
Ajit Pawar meets Sharad Pawar : शरद पवारांना भेटून बाहेर पडल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शरद पवारांना भेटून बाहेर पडल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
IPO Update : रेखा झुनझुनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ खुला, GMP पोहोचला 422 रुपयांवर,दमदार परतावा मिळणार?
आरोग्य क्षेत्रातील कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला, GMP पोहोचला 422 रुपयांवर,दमदार परतावा मिळणार?
EPFO : पीएफ खात्यातील पैसे काढणं सोपं होणार, एटीएममधून पैसे कधीपासून मिळणार, नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातून पैसे एका क्लिकवर काढता येणार, एटीएममधून पैसे कधी मिळणार, अधिकाऱ्यांकडून महत्त्वाची माहिती
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Embed widget