एक्स्प्लोर
ठाणे-बेलापूर रस्त्यावर दुरुस्तीमुळे कोंडी, लाँग वीकेंडमुळे ट्राफिक जाम
ठाणे-बेलापूर मार्गावर वाहनांना चार दिवसांसाठी नो एण्ट्री असल्यामुळे सोमवारपर्यंत हा रोडब्लॉक पाहायला मिळणार आहे.
ठाणे : कळवा-विटाव्यात रस्त्याचं काम सुरु असल्यामुळे ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक कालपासून ऐरोली मार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना नाहक ऐरोलीचाही टोल भरावा लागत आहे. म्हणूनच चालकांनी संताप व्यक्त केला आहे.
ऐरोली टोलनाक्याजवळ टोलवसुलीमुळे वाहतूक कोंडी होत आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर वाहनांना चार दिवसांसाठी नो एण्ट्री असल्यामुळे सोमवारपर्यंत हा रोडब्लॉक पाहायला मिळणार आहे. कळवा-विटावा रेल्वेब्रीज खालील खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्यात येणार आहेत.
हार्बर रेल्वेवर तीन दिवसांचा मेगाब्लॉक, विशेष बसची सो
पर्यायी मार्ग म्हणून पटणी-ऐरोली रोडने ऐरोली नॉलेज पार्क मार्गे आणि ऐरोली जंक्शन येथून पूर्व द्रुतगती महामार्गावर जाता येईल. या बंदीच्या अधिसूचनेत, पोलिस वाहनं, रुग्णवाहिका, फायरब्रिगेड, अत्यावश्यक सेवेतील तसंच या पुलाच्या कामातील वाहनांना लागू राहणार नसल्याचं ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी सांगितलं.ठाणे-नवी मुंबईकरांचा खोळंबा, कळवा-विटावा रस्ता 4 दिवस बंद
एकीकडे हार्बर मार्गावरील पनवेल ते नेरुळ दरम्यान तीन दिवस मेगाब्लॉक आहे. त्यामुळे चाकरमान्यांना आपल्याला वाहनानं ठाणे-मुंबई गाठावं लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बुलढाणा
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement