एक्स्प्लोर
Advertisement
'आमदार निवास'मध्ये सनी लिओनी!
सनी लिओनी आमदार निवासात आली होती. ही घटना मुंबईतली आहे. सकाळी दहा वाजता आलेली सनी रात्रीपर्यंत या निवासात होती.
मुंबई: अभिनेत्री सनी लिओनी आमदार निवासात! चक्रावलात ना? ही बातमी अगदी खरी आहे. आमदार निवासात सनी लिओनी दिसली आहे. एका गाण्यासाठी तिला बोलावलं गेलं होतं. कुणाचा आमदार निवास.. त्याचं ठिकाण कोणतं? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील, तर माहितीसाठी एबीपी माझाकडे आलेली ही खास बातमी वाचाच.
सनी लिओनी आमदार निवासात आली होती. ही घटना मुंबईतली आहे. सकाळी दहा वाजता आलेली सनी रात्रीपर्यंत या निवासात होती. इतकंच नव्हे, तर एका गाण्यावर तिने ठुमकेही लागवले. ते गाणं होतं मराठी. हे नेमकं गाणं कोणतं होतं, हे ऐकाल तर थक्क व्हाल. काही महिन्यांपूर्वी आलेल्या शांताबाई.. या गाण्यावर सनी थिरकली आणि उपस्थितांना वेड लावलं. आता प्रश्न पुढचा येतो की हे आमदार नेमके कोण.. कुणाच्या घरी सनी आली.. तिला कुणी बोलावलं.. तर आता पुढची बातमी वाचा.
हे आमदार निवास.. खरंखुरं आमदार निवास नसून तो आहे आमदार निवास नावाचा एक आगामी मराठी सिनेमा. संजीव राठोड दिग्दर्शित या सिनेमाचं शूट सध्या अंधेरीत चालू आहे. त्यातल्या एका गाण्यासाठी सनीला बोलावण्यात आलं होतं. सनी लिओनीने यापूर्वी बॉईज या सिनेमासाठी कुठं कुठं जायाचं हनीमूनला या गाण्यावर नाच केला आहे. हा चित्रपटही तिकीट बारीवर कमालीचा हिट झाला. आता ती आमदार निवास या सिनेमासाठी गाणं करते आहे.
काही महिन्यांपूर्वी गाजलेलं शांताबाई या गाण्यावर हा नाच असून, अस्सल मराठमोळ्या वेशभूषेत सनी दिसेल. गोरेगावच्या स्टुडिओमध्ये हे शूट पार पडलं. तिच्यासोबत या गाण्यात अभिनेता मंगेश देसाई, सयाजी शिंदेही असणार आहेत. गाण्याचं शूट नुकतंच संपलं असून, पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.
‘शांताबाई’ची किंमत किती?
शांताबाई हे गाणं कमाल गाजलं. एका कॅसेट कंपनीकडे या गाण्याचे हक्क आहेत. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक संजीव राठोड यांनी या गाण्याचे हक्क विकत घेतले असून, त्यासाठी त्यांना काही किंमत मोजावी लागली. ही किंमत ऐकाल तर थक्क व्हाल. मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार या गाण्यासाठी या निर्मात्याने तब्बल आठ लाख रूपये मोजले आहेत. आता या रकमेतली किती रक्कम गायकाला मिळाली ते पाहावं लागेल. पण या गाण्याचे हक्क संबंधित कॅसेट कंपनीकडे असल्यामुळे त्यातली बहुतांश रक्कम त्याच कंपनीला मिळाल्याचं बोललं जातं.
संबंधित बातम्या
सनीला अडल्ट फिल्ममध्ये पाहून पती डॅनियलला काय वाटायचं?
बायोपिकवरुन प्रश्न विचारणाऱ्यांना सनी लिओनीची उत्तरं
करनजीत कौर ते पॉर्न स्टार, सनी लिओनीचा प्रवास लवकरच पडद्यावर
बुजगावण्याऐवजी सनी लिओनी, शेतकऱ्याची अनोखी शक्कल
बॉक्स ऑफिसच नव्हे, 'सर्च बॉक्स'मध्येही सनी लिओनी अव्वल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement