Sumitra Mahajan Health | सुमित्रा महाजन यांची प्रकृती उत्तम, अफवांचे मुलाकडून खंडन
लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या प्रकृतीविषयी अफवा पसल्या होत्या. परंतु सुमित्रा महाजन यांची प्रकृती उत्तम असून अफवांकडे लक्ष देऊ नका, असं आवाहन त्यांचे पुत्र मंदार महाजन यांनी केलं आहे.
मुंबई : माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या प्रकृती संदर्भातील बातम्या पूर्णपणे निराधार आहेत. सुमित्रा महाजन यांच्या मुलाने या संदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला असून सुमित्रा महाजन यांनी तब्येत एकदम ठणठणीत असल्याचे सांगितले. तसेच समाजमाध्यमांवर पसरलेल्या बातम्यांचे खंडन केले आहे.
काँग्रेस नेते शशी थरुर यांनी अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन सुमित्रा महाजन यांच्या प्रकृतीसंदर्भात ट्वीट केले होते. त्यानंतर, अनेकांकडून सुमित्रा महाजन यांच्या प्रकृतीसंदर्भात ट्वीट करण्यात आले होते. मात्र, सुमित्रा महाजन यांच्यासंदर्भातील ते वृत्त खोटे असल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, "ताई एकदम स्वस्थ असून.. त्यांना दीर्घायुष्य लाभो...!" कैलाश विजयवर्गीय यांच्या ट्वीटनंतर थरुर यांनी ट्वीट डिलीट केले आहे. त्यामुळे, ही बातमी अफवा असल्याचं स्पष्ट झाले.
Thanks @kailashOnline. I have deleted my tweet. I wonder what motivates people to invent and spread such evil news that takes in people. My best wishes for Sumitra ji’s health and long life.
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) April 22, 2021
सुमित्रा महाजन यांचे पुत्र मंदार महाजन म्हणाले की, "आईची तब्येत उत्तम आहे. सोशल मीडियावर आईच्या प्रकृतीविषयी ज्या उलटसुलट चर्चा झाल्या त्या अफवा असून कृपया त्यावर विश्वास ठेवू नका. मी संध्याकाळीच आईला भेटलो असून ती एकदम स्वस्थ आहे. आईची कोरोना चाचणी देखील निगेटिव्ह आहे."
#Mrs. Sumitra Mahajan (ताई) is all well...It was all unfortunately spread rumour regarding her death on Social media yesterday late evevning...!
— Govind Gurjar गोविंद गुर्जर (@govindtimes) April 23, 2021
Here is @S_MahajanLS
Son Mr. Mandar Mahajan to tell you the good News..! pic.twitter.com/MdkN0ob81p
How could news channels run a report on my so called demise without even cross checking with the Indore administration? My niece refuted Mr. Tharoor on Twitter but what was the urgency in announcing without confirmation?: Sumitra Mahajan, former Lok Sabha speaker (File photo) pic.twitter.com/eE6mv15rly
— ANI (@ANI) April 23, 2021
सुमित्रा महाजन या 'ताई' म्हणून राजकीय वर्तुळात सुपरिचित आहेत. महाराष्ट्रातील चिपळूण ही त्यांची जन्मभूमी, तर इंदूर ही कर्मभूमी. 1989 पासून सुमित्रा महाजन खासदार म्हणून लोकसभेवर निवडून येत होत्या. मध्य प्रदेशातल्या इंदूरमधून सुमित्रा महाजन तब्बल आठ वेळा लोकसभेवर निवडून आल्या. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडाळातही महाजन यांनी काम केलं आहे. गणेश मावळकर, शिवराज पाटील, मनोहर जोशी यांच्यानंतर सुमित्रा महाजन यांच्या रुपाने एका मराठी महिलेला लोकसभा अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला होता.