एक्स्प्लोर

मोठ्या नेत्यांची फोनवरील चर्चा समजणारं तंत्रज्ञान अजून तरी नाही, युतीच्या जागावाटपाच्या चर्चांवर मुनगंटीवारांचं उत्तर

उद्धव ठाकरे हे परिपक्व नेते आहेत. 1995 च्या फॉर्म्युल्याची मागणी ते आजच्या बदलत्या परिस्थितीमध्ये करतील, असं मला वाटत नाही. या बातम्या कपोलकल्पित असून कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून आल्या आहेत, असं म्हणत मुनगंटीवारांनी 171-117 असं जागावाटपाचं सूत्र शिवसेनेने दिल्याची चर्चा फेटाळून लावली.

मुंबई : 'फोनवर दोन मोठ्या नेत्यांमध्ये एखादी चर्चा झाली आणि ती पत्रकारांना समजली, असं काही तंत्रज्ञान अजून तरी विकसित झालेलं नाही' असं म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार शिवसेना-भाजप युतीबाबत रंगणाऱ्या चर्चांना फटकारलं आहे. उद्धव ठाकरे हे परिपक्व नेते आहेत. 1995 च्या फॉर्म्युल्याची मागणी ते आजच्या बदलत्या परिस्थितीमध्ये करतील, असं मला वाटत नाही. या बातम्या कपोलकल्पित असून कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून आल्या आहेत, असं म्हणत मुनगंटीवारांनी 171-117 असं जागावाटपाचं सूत्र शिवसेनेने दिल्याची चर्चा फेटाळून लावली. जास्तीत जास्त जागा कोणी लढवायच्या यासाठी युती नसते, तर जास्तीत जास्त जागा निवडून आणून जनहिताचे सरकार आणण्यासाठी होते, असंही मुनगंटीवार म्हणाले. युती व्हावी ही तर आमची जाहीर मागणी आहे, आम्ही ती अनेकदा बोलून दाखवली आहे. याबाबत स्पष्ट भूमिका व्यक्त केली आहे. फोनवर तर आमचं रोजच बोलणं होतं, असंही सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठ्या भावाच्या भूमिकेत राहण्याचा आग्रह कायम ठेवत 1995 च्या जागावाटप सूत्राचा प्रस्ताव भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यापुढे ठेवल्याचं वृत्त होतं. 1995 मध्ये शिवसेनेने विधानसभेच्या 171 आणि भाजपने 117 जागा लढवल्या होत्या. त्यावेळी 138 जागा जिंकून राज्यात शिवसेना-भाजप युतीचं पहिलं सरकार स्थापन झालं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkumar Shinde Exclusive : प्रहारचे आमदार एकानाथ शिंदेंच्या गळाला; बच्चू कडू्ंना धक्काTop 25 : टॉप 25 न्यूज : 6 PM : 6 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAshtvinayak Yatra : अष्टविनायक यात्रा रांंजणगावात; घरगुती गणपती सजावट स्पर्धा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget