एक्स्प्लोर

दररोज रुग्णालयाची पाहणी करुन व्हिडीओ पाठवा, अधिष्ठातांना आदेश

मुंबई : निवासी डॉक्टरांच्या संपानंतर सरकारी रुग्णालयांच्या प्रमुखांवर नवी जबाबदारी येऊन ठेपली आहे. यापुढे रुग्णालयाचे डीन अर्थात अधिष्ठातांना त्यांच्या संस्थेची दर दिवशी दोन वेळा पाहणी करावी लागणार आहे. एवढंच नाही तर या पाहणीचा व्हिडीओ तयार करुन तो मंत्रालयात संबंधित विभागाला पाठवायचा आहे. राज्याचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी हे आदेश दिले आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांकडून निवासी डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये सर्व आयसीयू, आपत्कालीन कक्ष, प्रवेश आणि बाहेर पडण्याचा गेट तसंच ड्युटीवरील सुरक्षारक्षक हे सगळं आलं पाहिजे, असंही सांगण्यात आलं आहे. सुट्टीतही ह्या व्हिडीओला अपवाद नाही. राजगोपाल देवरा म्हणाले की, "निवासी डॉक्टरांच्या संपादरम्यान, त्यांच्याशी केलेल्या चर्चेत प्रामुख्याने समोर आलेली बाब म्हणजे डीन बऱ्याचदा रुग्णालयातील नियमित कामकाजात सहभागी होत नाहीत." "जर रुग्णालयात पुरेसे सुरक्षारक्षक नसतील किंवा किती नातेवाईकांना रुग्णांना भेटण्याचा परवानगी असावी, याबाबत जर कोणता नियम नसेल तर ती अधिष्ठातांची चूक आहे," असं देवरा यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितलं. आता नियमित जबाबदारीसोबतच जे जे रुग्णालयाचे डीन डॉ. तात्याराव लहाने, केईएम रुग्णालयाचे डीन अविनाश सुपे यांच्यावर परफेक्ट वाईड अँगल्स आणि क्लोजअप शॉट्स घेण्याची अतिरिक्त जबाबदारी असेल. पण महापालिका रुग्णालयाच्या अधिष्ठातांसाठी हे काम थोडं जास्त असेल. कारण त्यांना दिवसातून तीन वेळा रुग्णालयाची पाहणी करुन त्याचा व्हिडीओ बनवण्यास सांगितलं आहे. दरम्यान, या निर्णयामागचा हेतू योग्य असला तरी मात्र त्याच्या अंमलबजावणीबाबत अनेक प्रश्नही विचारले जात आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2025 | मंगळवार
Sushma Andhare on Manikrao Kokate: आमच्याकडे आणखी व्हिडीओ, बाहेर काढायला भाग पाडू नका; सुषमा अंधारेंचा माणिकराव कोकाटेंना इशारा
आमच्याकडे आणखी व्हिडीओ, बाहेर काढायला भाग पाडू नका; सुषमा अंधारेंचा माणिकराव कोकाटेंना इशारा
एसटी अन् दुचाकीचा भीषण अपघात, 2 जण ठार; भरधाव बसने दुचाकीला फरफटत नेलं
एसटी अन् दुचाकीचा भीषण अपघात, 2 जण ठार; भरधाव बसने दुचाकीला फरफटत नेलं
SBI : स्टेट बँकेचा देशातील सर्वात मोठा QIP यशस्वी, 25 हजार कोटींची उभारणी, एलआयसीनं बाजी मारली, सर्वाधिक शेअर खरेदी
स्टेट बँकेचा सर्वात मोठा QIP यशस्वी, 25 हजार कोटींची उभारणी, एलआयसीनं बाजी मारली, सर्वाधिक पैसे लावले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

One Plus Nord CE 5 : स्मार्ट लूक, दमदार बॅटरी, किंमत किती? वनप्लस Nord CE 5 ची A टू Z माहिती
Operation Sindoor | ऑपरेशन सिंदूरवर संसदेत पुढच्या आठवड्यात चर्चा, उद्या ठरणार तारखा
Uddhav Thackeray राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता, ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक
Sharad Pawar Devendra Fadnavis 'महाराष्ट्र नायक' पुस्तकातून शरद पवार यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक
Manikrao Kokate फडणवीस बातम्या पाहून बोलले असतील, मुख्यमंत्र्यांनी सुनावलं तरीही कोकाटेंचा अजब दावा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2025 | मंगळवार
Sushma Andhare on Manikrao Kokate: आमच्याकडे आणखी व्हिडीओ, बाहेर काढायला भाग पाडू नका; सुषमा अंधारेंचा माणिकराव कोकाटेंना इशारा
आमच्याकडे आणखी व्हिडीओ, बाहेर काढायला भाग पाडू नका; सुषमा अंधारेंचा माणिकराव कोकाटेंना इशारा
एसटी अन् दुचाकीचा भीषण अपघात, 2 जण ठार; भरधाव बसने दुचाकीला फरफटत नेलं
एसटी अन् दुचाकीचा भीषण अपघात, 2 जण ठार; भरधाव बसने दुचाकीला फरफटत नेलं
SBI : स्टेट बँकेचा देशातील सर्वात मोठा QIP यशस्वी, 25 हजार कोटींची उभारणी, एलआयसीनं बाजी मारली, सर्वाधिक शेअर खरेदी
स्टेट बँकेचा सर्वात मोठा QIP यशस्वी, 25 हजार कोटींची उभारणी, एलआयसीनं बाजी मारली, सर्वाधिक पैसे लावले
परिवहनमंत्र्यांच्या जिल्ह्यातच ST इंजिनिअर जाळ्यात; कॅन्टीनचा दरवाजा बंद करण्यासाठी 10 हजारांची लाच
परिवहनमंत्र्यांच्या जिल्ह्यातच ST इंजिनिअर जाळ्यात; कॅन्टीनचा दरवाजा बंद करण्यासाठी 10 हजारांची लाच
हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव; डान्सबारवरुन जुंपली, रामदास कदमांचे अनिल परबांवर पलटवार
हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव; डान्सबारवरुन जुंपली, रामदास कदमांचे अनिल परबांवर पलटवार
Devendra Fadnavis and Sharad Pawar: देवेंद्रांच्या कार्याची गती अफाट, ते थकत कसे नाहीत, हा प्रश्न मला पडतो; शरद पवारांकडून फडणवीसांवर कौतुकाचा  वर्षाव
देवेंद्रांच्या कार्याची गती अफाट, ते थकत कसे नाहीत, हा प्रश्न मला पडतो; शरद पवारांकडून फडणवीसांचं कौतुक
Nashik News: डान्स क्लासचा हट्ट धरला, आई-वडिलांनी नकार देताच मुलीने हार्पिकची बाटली तोंडाला लावली, मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयात प्राणज्योत मालवली
डान्स क्लासचा हट्ट धरला, आई-वडिलांनी नकार देताच मुलीने हार्पिकची बाटली तोंडाला लावली, मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयात प्राणज्योत मालवली
Embed widget