एक्स्प्लोर
स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, 25 कोटींवर डल्ला
चोरट्यांनी बँकेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करत विविध खात्यांमध्ये शिरकाव केला.

मुंबई : स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या मुंबई शाखेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला चोरट्यांनी त्या 25 कोटी रुपयांवर डल्ला मारला. बँकेने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत मागील आठवड्यात शुक्रवारी (5 ऑक्टोबर) याबाबत तक्रार नोंदवली होती. चोरट्यांना बँकेतील 147 कोटी रुपये चोरण्याचा प्रयत्न झाला होता.
चोरट्यांनी बँकेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करत विविध खात्यांमध्ये शिरकाव केला. त्यानंतर या खात्यांमधून सुमारे 25 कोटी रुपये अनेक परदेशी बँकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आले. परंतु माहिती मिळताच बँकेने वेळीच सर्व खात्यांचे ऑनलाईन व्यवहार बंद केल्याने मोठा अपहार टळल्याची सूत्रांची माहिती आहे.
या हल्ल्यात तब्बल 147 कोटी रुपये ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु माहिती मिळताच व्यवहार रोखण्यात आला. त्यामुळे परदेशी बँकांमध्ये ट्रान्सफरसाठी पाठवलेली रक्कम परत आणली.
रहेजा सेंटरमधील पंधराव्या मजल्यावर स्टेट बँक ऑफ मॉरिशसची नरिमन पॉईंट शाखा आहे. ब्रान्च इनचार्ज प्रकाश नारायण यांनी या प्रकरणावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. बँकेवर सायबर हल्ल्याची नऊ महिन्यातील ही तिसरी घटना आहे. सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
