एक्स्प्लोर

एल्फिन्स्टन-परेलला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू

सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास ब्रिज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रिजवरील प्रवाशांचा एकच हलकल्लोळ माजला

मुंबई : मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर  मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 39 प्रवासी जखमी झाले आहेत. - डोंबिवलीतील सचिन कदम (४०) यांचा एल्फिन्स्टन दुर्घटनेत मृत्यू, डोंबिवलीत सचिन कदम यांच्यावर अंत्यसंस्कार आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास फूट ओव्हर ब्रिजवरील पत्रा कोसळल्याची ओरड झाली. यामुळे ब्रिजवरील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यातच ब्रिज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रिजवरील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ माजला. त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे श्वास गुदमरुन आणि चिरडून 22 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये 14 पुरुष, तर आठ महिलांचा समावेश आहे. सुमारे 39 जण जखमी असून त्यांच्यावर परळमधील केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये 30 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. stampede-at-parel-railway 2 अग्निशमन दलाचे जवान, महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. दुर्घटनेनंतर जखमी झालेल्या प्रवाशांना इतरांनी तातडीने मदत केली. जखमी आणि मृतांना मिळेल त्या वाहनांमधून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र केईएममध्ये दाखल करेपर्यंत 15 प्रवाशांनी प्राण सोडला होता. तर काही जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. मुंबईकरांची तत्परता, रक्ताचा पुरवठा केईएम रुग्णालयाला जखमींवर उपचारासाठी रक्ताची आवश्यकता निर्माण झाली होती. A पॉझिटिव्ह , A निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह आणि AB निगेटिव्ह रक्तगटातील दात्यांची गरज होती, मात्र मुंबईकरांच्या तत्परतेमुळे अवघ्या दोन तासांतच रुग्णालयाला रक्ताचा आवश्यक तितका पुरवठा उपलब्ध झाला. त्यामुळे केईएम रुग्णालयाकडून रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. त्याचप्रमाणे हॉस्पिटलजवळ गर्दी न करण्याचंही आवाहन करण्यात आलं. मृतांची नावं मुकेश मिश्रा सचिन कदम मयुरेश हळदणकर अंकुश जैस्वाल सुरेश जैस्वाल ज्योतिबा चव्हाण रोहित परब अॅलेक्स कुरिया हिलोनी देढीया चंदन गणेश सिंह मोहम्मद शकील मसूद आलम महिला शुभलता शेट्टी सुजाता शेट्टी श्रद्धा वरपे मीना वरुणकर तेरेसा फर्नांडिस मृतांच्या नातेवाईकांना रेल्वे आणि राज्य सरकारतर्फे प्रत्येकी पाच लाख या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा राज्य सरकारने केली आहे, तर जखमींवरील उपचारांचा सर्व खर्च सरकार उचलणार आहे. गरज पडल्यास जखमींना उपचारांसाठी इतरत्र हलवण्यात येईल, असंही मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. https://twitter.com/Dev_Fadnavis/status/913674080146137089 https://twitter.com/Dev_Fadnavis/status/913673588246499328 https://twitter.com/CMOMaharashtra/status/913686843387973632 या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना रेल्वेतर्फे प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे, तर गंभीर जखमींना एक लाख आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत रेल्वे करणार आहे. https://twitter.com/ANI/status/913701258887806977 https://twitter.com/ANI/status/913701785025392640 उच्चस्तरीय चौकशीचे आदेश पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात या घटनेची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयातर्फे देण्यात आले आहेत. https://twitter.com/abpmajhatv/status/913671469904805888 एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटना हेल्पलाईन नंबर आणि आवाहन हेल्पलाईन - 24136051 24107020 24131419 blood_help_kem पावसावर खापर पावसामुळे काही प्रवासी थांबून राहिले. त्यामुळे प्रवाशांचा मोठा लोंढा आला. त्यातच ब्रिज निसरडा झाल्यामुळे काही जण घसरले, आणि एकमेकांवर पडून चेंगराचेंगरी झाली, असा दावा जीआरपीने केला आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी केईएम रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. रेल्वेमंत्री पियुष गोयल मुंबईत दुर्दैवी योगायोग म्हणजे रेल्वेमंत्री पियुष गोयल रेल्वेच्या नव्या टाईमटेबलच्या उद्घाटनासाठी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्याचवेळी मध्य रेल्वेवरील एल्फिन्स्टन स्थानकावर ही दुर्घटना घडली आहे. त्यामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मूळ मुंबईचे असलेले पियुष गोयल रेल्वेमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत आले आहेत. या दौऱ्यात त्यांचा लोकल प्रवास नियोजित होता. पियुष गोयल घटनास्थळाला भेट देणार असून रेल्वे प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. माझ्या मुंबईत ही दुर्घटना घडल्याचं अतीव दुःख झालं आहे, असं सांगत पियुष गोयल यांनी चेंगराचेंगरीविषयी हळहळ व्यक्त केली. माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही चेंगराचेंगरीच्या घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे. https://twitter.com/PiyushGoyal/status/913672213475287041 https://twitter.com/sureshpprabhu/status/913677104994291714 माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागकडूनही या घटनेविषयी शोक व्यक्त करण्यात आला आहे. 'ही घटना हृदय पिळवटून टाकणारी, कर भरुनही निरपराधांचा जीव जातोय, दुर्दैवाने मृत्यू स्वस्त झालाय' असं ट्वीट वीरेंद्रने केलं आहे. https://twitter.com/virendersehwag/status/913682658026127361 सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा : शिवसेना दरम्यान, रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा घेऊन रेल्वे प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी केली आहे. हा अपघात नसून मुंबईकरांचं हत्याकांड आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहे. मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील एल्फिस्टन स्टेशन आणि मध्य रेल्वेवरील परेल स्टेशनला जोडणाऱ्या पुलावर प्रवाशांसाठी अरुंद वाट असल्यामुळे कायम गर्दी होते. त्यातच पाऊस आल्यामुळे एका प्रवाशाचा पाय घसरला आणि धावपळीत असलेले अनेक जण चेंगरले गेल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं, तर एकाला दम्याचा अटॅक आल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे. ब्रिज पडल्याच्या किंवा शॉर्ट सर्किटच्या कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन करण्यात आलं आहे. https://twitter.com/abpmajhatv/status/913648721551810560 एल्फिन्स्टन- परेल पुलावर नेमकं काय घडलं? • सकाळी 9.30 च्या सुमारास पावसाची मोठी सर आली. • त्याचवेळी मध्य रेल्वेवरील परेल आणि पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन स्टेशनवर एकाचवेळी लोकल आल्या. • त्यामुळे बाहेर पडणाऱ्या पादचारी पुलावर गर्दी झाली. • त्याचवेळी पत्रा कोसळल्याचं सांगण्यात आलं. • गर्दीच्या वेळी मोठा आवाज झाल्याच्या गैरसमजातून धावपळ सुरु झाली. • ब्रिज पडत असून शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरली, लोक मिळेल ती जागा पकडून बाहेर पडू लागले • एकमेकांना तुडवत लोकांची धावपळ सुरु झाली • सकाळी 9.30 च्या सुमारास थेट जखमी आणि मृतांचा आकडा समोर आला. तिघांचा मृत्यू. • जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. • काही मिनिटांतच मृतांचा आकडा वाढत गेला एल्फिन्स्टन-परेलला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू एल्फिन्स्टन-परेलला गर्दी का होते? परेल आणि एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकांवर सकाळच्या वेळी कायमच प्रवाशांची गर्दी असते. अनेक ऑफिस या भागात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नोकरदार या भागात लोकलने येतात. गेल्या काही वर्षांत प्रवाशांची संख्या वाढलेली आहे, मात्र ब्रिजची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने काहीच प्रयत्न झालेले नाहीत. उद्या दसरा असल्यामुळे अनेक जण खरेदीसाठी दादर आणि परिसरात जातात. सकाळच्या वेळेत असलेली गर्दी आणि त्यातच दोन्ही मार्गांवर लोकल आल्यास अचानक उडणारी झुंबड नेहमीची आहे. त्यामुळेच ही चेंगराचेंगरी झाल्याचं म्हटलं जात आहे. प्रवाशांच्या तुलनेत ब्रिजची क्षमता कमी असल्यामुळे गर्दीच्या वेळी पुलावर ताण वाढतो, अशी ओरड नेहमीच प्रवाशांकडून होते. त्याकडे प्रशासनाकडून लक्ष न दिलं गेल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. या घटनेनंतर स्थानिक रहिवासी आणि रेल्वे प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मृतांविषयी हळहळ व्यक्त केली जात असतानाच या अपघातासाठी प्रशासनाला जबाबदार ठरवलं जात आहे. एल्फिन्स्टनचं प्रभादेवी नामकरण एल्फिन्स्टन स्थानकाचं नामकरण प्रभादेवी करण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यानंतर कागदोपत्री या स्थानकाचं नाव प्रभादेवी करण्यात आलं. मात्र नाव बदलण्यापेक्षा प्राथमिक सुविधांकडे लक्ष द्या, अशी मागणी केली जात आहे. बुलेट ट्रेन आणण्याच्या आधी मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेवरील सुविधा सुधारणांवर भर द्या, असं संतप्त प्रवासी सांगत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget