एक्स्प्लोर

ST Strike : एसटी कामगारांच्या संपावर तोडगा निघणार? शरद पवारांच्या उपस्थितीत आज बैठक

एसटीच्या कृती समितीची बैठक आज शरद पवारांसोबत होतेय. परिवहन मंत्री अनिल परब सुद्धा या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत नेमका यावर काय तोडगा काढला जातो याकडे लक्ष लागून आहे.

ST Employee Strike : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपाला आता दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. काही कर्मचारी कामावर परतले असले तरी अजूनही काही एसटी कर्मचारी संपातून माघार घ्यायला तयार नाहीत. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघणार का याकडे लक्ष लागून आहे. आज राष्ट्रवादीचे खासदार शरद पवारांच्या (Sharad Pawar) उपस्थितीत एसटीच्या कृती समितीची बैठक होणार आहे. शरद पवार आणि संपकरी कर्मचारी व एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत दुपारी 12.30 वाजता ही बैठक होणार आहे. 

या बैठकीत पुन्हा एकदा एसटी महामंडळ विलीनिकरणाची मागणी समोर ठेवून त्याबाबत चर्चा होणार आहे. शरद पवारांसोबत परिवहन मंत्री अनिल परब सुद्धा या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.  मागील दोन महिन्यांपासून पगार वाढ देऊन सुद्धा कर्मचारी संपातून माघार घेण्यास तयार नसल्याने या बैठकीत नेमका यावर काय तोडगा काढला जातो याकडे लक्ष लागून आहे.

महत्वाचे म्हणजे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर ज्या कारवाई करण्यात आल्या त्या कारवाया मागे घेण्याबाबत कर्मचारी संघटनांकडून मागणी केली जाणार आहे.  संपाची नोटीस दिलेल्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने संपातून माघार घेऊनही एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाशिवाय माघार न घेण्याची भूमिका घेतल्याने अद्याप एसटीची सार्वजनिक सेवा सुरू होऊ शकली नाही. 

एसटी कर्मचाऱ्यांचा संप नेतृत्वहीन असल्याने राज्य सरकारने चर्चा तरी कोणाशी करायची, असा पेच निर्माण झाला आहे. यापूर्वी कृती समितीशी चर्चा करून घरभाडे, महागाई भत्त्याची वाढ देण्यात आली. त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा करून वेतनवाढ देण्यात आली, तर संपकरी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांच्याशी चर्चा करून संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यात आली. त्यानंतरही एसटी कर्मचारी मात्र, अद्याप संपावर कायम आहेत.  यामुळं शरद पवार यांच्या उपस्थितीत आज होणाऱ्या बैठकीकडे लक्ष लागून आहे.   

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सैराट प्रेमाची कहाणी! बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह, संतापलेल्या भावाची पतीला बेदम मारहाण
सैराट प्रेमाची कहाणी! बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह, संतापलेल्या भावाची पतीला बेदम मारहाण
Devendra Fadnavis on Uttam Jankar : पोपटांना मोठं केलं, तुम्ही विमानातून घेऊन आलात, माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर सत्यानाश करतो, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
पोपटांना मोठं केलं, तुम्ही विमानातून घेऊन आलात, माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर सत्यानाश करतो, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
Aaditya Thackeray In Kolhapur : शाहू महाराजांविरोधात भाजप एका गद्दाराला उभा करतील असं वाटतं नव्हतं; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
शाहू महाराजांविरोधात भाजप एका गद्दाराला उभा करतील असं वाटतं नव्हतं; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Shahu Maharaj : राजर्षी शाहू महाराज यांच्या रक्ताचा आणि विचारांचा खरा वारसदार; कदमबांडेंच्या दाव्याला शाहू महाराजांचे पत्रकातून उत्तर
राजर्षी शाहू महाराज यांच्या रक्ताचा, विचारांचा खरा वारसदार : शाहू महाराजांचे कदमबांडेंना उत्तर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis:लस पुण्यात शोधली,लसीकरणासाठी यंत्रणा महाराष्ट्राची:उद्धव ठाकरेChhagan Bhujbal Nashik : समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळांंचं महायुतीवर दबावतंत्र ?Chhagan Bhujbal Meet Shantigiri Maharaj:शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळाने घेतली  छगन भुजबळांची भेटSpecial Report Abhijit Patil : शरद पवारांना सोडून अभिजीत पाटील भाजपमध्ये जाणार ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सैराट प्रेमाची कहाणी! बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह, संतापलेल्या भावाची पतीला बेदम मारहाण
सैराट प्रेमाची कहाणी! बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह, संतापलेल्या भावाची पतीला बेदम मारहाण
Devendra Fadnavis on Uttam Jankar : पोपटांना मोठं केलं, तुम्ही विमानातून घेऊन आलात, माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर सत्यानाश करतो, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
पोपटांना मोठं केलं, तुम्ही विमानातून घेऊन आलात, माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर सत्यानाश करतो, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
Aaditya Thackeray In Kolhapur : शाहू महाराजांविरोधात भाजप एका गद्दाराला उभा करतील असं वाटतं नव्हतं; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
शाहू महाराजांविरोधात भाजप एका गद्दाराला उभा करतील असं वाटतं नव्हतं; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Shahu Maharaj : राजर्षी शाहू महाराज यांच्या रक्ताचा आणि विचारांचा खरा वारसदार; कदमबांडेंच्या दाव्याला शाहू महाराजांचे पत्रकातून उत्तर
राजर्षी शाहू महाराज यांच्या रक्ताचा, विचारांचा खरा वारसदार : शाहू महाराजांचे कदमबांडेंना उत्तर
Devendra Fadnavis on Chhagan Bhujbal : ठाकरे-पवारांसाठी सहानुभूतीची लाट, छगन भुजबळांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
ठाकरे-पवारांसाठी सहानुभूतीची लाट, छगन भुजबळांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
CSK vs SRH : तुषार देशपांडेनं हैदराबादच्या फलंदाजीला सुरुंग लावला, धोकादायक ट्रेविस हेड-अभिषेक शर्माचा करेक्ट कार्यक्रम
मराठमोळ्या तुषार देशपांडेचा धमाका, हैदराबादच्या फलंदाजीला सुरुंग लावला, ट्रेविस हेड-अभिषेक शर्माचा करेक्ट कार्यक्रम
Rohit Pawar on Ajit Pawar : आताचे दादा भाजपचे, पूर्वी राज्यात प्रचार, आता बारामतीच्या सोसायटीत जायची वेळ आली; रोहित पवारांचा सडकून प्रहार
दादा आमच्यासोबत मुख्यमंत्री झाले असते, आता बारामतीच्या सोसायटीत प्रचाराची वेळ आली; रोहित पवारांचा सडकून प्रहार
Chhagan Bhujbal : समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळांचे महायुतीवर दबावतंत्र? पाच लोकसभेच्या जागांवर निवडणूक लढवणार
समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळांचे महायुतीवर दबावतंत्र? पाच लोकसभेच्या जागांवर निवडणूक लढवणार
Embed widget