ST कामगारांसाठी शिवसेना आमदाराचा पुढाकार, संतोष बांगर यांनी पत्र लिहित केली विलीनीकरणाची मागणी
राज्यात अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन (Maharashtra ST Protest) अजूनही सुरुच आहे. कर्मचाऱ्यांना सरकारकडून वेगवेगळे प्रस्ताव दिले असतानाही अनेक कर्मचारी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कामावर परतत असले तरी अनेक कर्मचारी अजूनही कामावर आलेले नाहीत. या वर तोडगा म्हणून आता महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. सुमारे तीन हजार कंत्राटी चालक सरकार नेमणार असून आजपासून 400 कंत्राटी चालकांची नियुक्ती होणार आहे. आता या वादात शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी उडी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहित विलीनीकरणाची मागणी केली आहे. खुद्द shivsena आमदाराने केलेल्या या मागणीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.






















