एक्स्प्लोर

एसटी महामंडळाची आक्रमक भूमिका; 55 हजार संपकऱ्यांना नोटीस, तर कंत्राटी चालकांच्या भरतीचा निर्णय

ST Workers Strike Updates : एसटी महामंडळाने आता संप मोडून काढण्यासाठी आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

ST Workers Strike : मागील अडीच महिन्यापासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरू असून आता महामंडळाने आक्रमक भूमिका घेतली आहे. वेतनवाढीची घोषणा केल्यानंतरही फार कमी प्रमाणात कर्मचारी रूजू झाले. त्यामुळे आता एसटी महामंडळाने वाहतूक सुरू करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या चालकांची करारपद्धतीने नेमणूक करण्यात येणार आहे. तर, दुसरीकडे 55 हजार संपकऱ्यांना नोटीस बजावली आहे. 

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना साद

एसटी महामंडळाने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि पुन्हा एकदा एसटीची वाहतूक सुरळीत करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. एसटी महामंडळाने सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या चालकांना साद घातली आहे. महामंडळाने त्या अनुषंगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार वय 62 वर्ष पूर्ण होण्यासाठी किमान सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक असणे आवश्यक असल्याचे महामंडळाने म्हटले आहे. करार पद्धतीवर नेमणूक होणाऱ्या चालकांना दरमहा 26 हजार रुपये मानधन देण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे.  इच्छुक चालक ज्या विभागातून सेवानिवृत्त झाले, त्या विभागांमध्ये करारपद्धतीच्या नेमणुकीसाठी अर्ज करू शकणार आहेत. येत्या तीन दिवसांमध्ये अर्ज करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. इच्छुक उमेदवारावर एसटी महामंडळाच्या सेवेत असताना अत्यंत गंभीर व प्राणांतिक अपघाताची नोंद नसणे, शिक्षा म्हणून बडतर्फ किंवा सेवामुक्त केलेला नसावा अशी अटही महामंडळाने ठेवली आहे.

कंत्राटी चालकांची नियुक्ती

एसटीतील सेवानिवृत्तांना आवाहन करताना एसटी महामंडळाने इतरही कंत्राटी चालकांची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मनुष्यबळ उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेकडून करार पद्धतीने चालक भरती करून घेण्यासाठीचे अर्ज मागितले आहेत. या कंत्राटी चालकाकडे अवजड वाहन चालवण्याचा किमान एक वर्षाचा अथवा प्रवासी वाहतुकीचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्याशिवाय संबंधित उमेदवाराकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना व पीएसव्ही बॅच असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे चालकांची नियुक्ती करून देणाऱ्या संस्थांनी महामंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

55 हजार संपकऱ्यांना नोटीस 

एसटी महामंडळातील तब्बल 55 हजार संपकरी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आतापर्यंत एसटी महामंडळातील तब्बल 1144 कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत. तर 11 हजार 24 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.  कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या 55 हजार कर्मचाऱ्यांना संप काळातील पगार मिळणार नसल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

 

महत्त्वाच्या बातम्या

एका बाजूला एल निनो तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस, 6 दिवसात मुंबईत 1240 मीमी पाऊस, सर्व विक्रम मोडले, हवामानात नेमका काय बदल झाला? 
एका बाजूला एल निनो तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस, 6 दिवसात मुंबईत 1240 मीमी पाऊस, सर्व विक्रम मोडले, हवामानात नेमका काय बदल झाला? 
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर

व्हिडीओ

Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Share Market : कालच्या धक्क्यानंतर आज शेअर बाजार सावरला, एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई,कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक,एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?
Shashikant Shinde : शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; एनडीएत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, शशिकांत शिंदेंचं मविआच्या नेत्यांना आवाहन
Embed widget