एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ठाण्यात एसटीचे आठ कंत्राटी कामगार निलंबित, मुंबईत धरपकड

राज्यभरातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज कुठलीही पूर्वसूचना न देता संप पुकारला असून त्यामुळे ग्रामीण भागाची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या एसटीची सेवा पुरती कोलमडली आहे.

ठाणे : राज्यभरात सुरु असलेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. कारण ठाण्यात एसटीच्या आठ कंत्राटी कामगारांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर मुंबई आणि उस्मानाबादमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसाठी पुकारलेल्या संपात सहभागी झाल्यामुळे ठाण्यातील एसटीच्या आठ कंत्राटी कामगारांचं निलंबन करण्यात आलं आहे. कंत्राटी कामगारांना संपत सहभागी होण्याचा अधिकार नसल्याचं कारण देत ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज कुठलीही पूर्वसूचना न देता संप पुकारला असून त्यामुळे ग्रामीण भागाची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या एसटीची सेवा पुरती कोलमडली आहे. ठाण्याच्या खोपट एसटी आगारातही एकूण 383 कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांपैकी 50 टक्के कर्मचारी संपात सहभागी झाले. त्यामुळे अनेक एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली आहे. कामगारांच्या प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं, कार्यक्रमातून रावतेंचा काढता पाय 9 पैकी 8 कंत्राटी कामगार निलंबित त्यातच एकूण 9 कंत्राटी कामगारांपैकी 8 कंत्राटी कामगारही या संपात सहभागी झाले आहेत. मात्र आधीच अवैध ठरवण्यात आलेला हा संप आणि त्यात रोजंदारीवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना अशा संपात सहभागी होण्याचा अधिकारच नसल्याचा ठपका ठेवत, एसटी महामंडळाने या सर्वच्या सर्व 8 कामगारांना निलंबित केलं आहे. त्यांना पुन्हा सेवेत घ्यायचं की नाही? हे आता वरिष्ठांच्या आदेशानुसार ठरवण्यात येणार असल्याची माहिती खोपट एसटी डेपो प्रमुखांनी दिली आहे. त्यामुळे हे कामगार आता काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्त्वाचं आहे. मुंबई आणि उस्मानाबादेत घरपकड ठाण्यात एसटीचे आठ कंत्राटी कामगार निलंबित, मुंबईत धरपकड दुसरीकडे मुंबईतील परळमध्ये काही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं तर उस्मानाबादेत तिघांना अटक केली आहे. परळ डेपोतून पोलिस बंदोबस्तात एसटी बाहेर काढताना ज्या कर्मचाऱ्यांनी ती अडवली, त्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर उस्मानाबादमध्ये एसटीच्या संपामध्ये सहभागी झालेल्या तीन एसटी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शिवाय उस्मानाबादमधील एसटी स्थानकात पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. LIVE एसटी कर्मचाऱ्यांचं अचानक कामबंद आंदोलन नांदेडमध्ये एसटीची तोडफोड ठाण्यात एसटीचे आठ कंत्राटी कामगार निलंबित, मुंबईत धरपकड याशिवाय नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात संपादरम्यान एसटीची तोडफोड करण्यात आली आहे. भोकर इथून नांदेडकडे निघालेल्या एसटीवर अज्ञाताने दगड मारुन काचा फोडल्याची घटना घडली. शिवाय हदगावकडे निघालेल्या बसवरही दगडफेकीची घटना घडली आहे. वाहतूक नियंत्रकाचं निलंबन ठाण्यात एसटीचे आठ कंत्राटी कामगार निलंबित, मुंबईत धरपकड एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होण्यासाठी गेलेल्या अंबाजोगाई डेपोचे वाहतूक नियंत्रक व्हीपी चाटे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. चाटे यांच्याकडे कंडक्टरना लागणाऱ्या तिकीट मशिन देण्याची जबाबदारी आहे. त्या मशिनचं वाटप न करता चाटे संपात सहभागी झाले, म्हणून त्यांचं निलंबन करण्यात आल्याचं एसटी प्रशासनाने म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget