Coronavirus | कशी जिंकायची कोरोनाविरोधात लढाई? श्री श्री रविशंकर यांची विशेष मुलाखत
देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी आज मार्गदर्शन केलं. कोरोनापासून दूर राहण्यासाठी काही उपाय सांगितले आहे.
मुंबई : कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी आत्मबळ वाढवण्याची आवश्यकता आहे. मनात भीती निर्माण झाली तर रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे आपल्यात सकारात्मक उर्जा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचं मत आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले. कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर श्री श्री रविशंकर यांनी कोरोनापासून दूर कसे राहावे, यावर मार्गदर्शन केले. यावेळी सर्वांना सावधान राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
रोगप्रततिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित लिंबू पाणी घ्यावे. आपलं जेवण जास्त आम्लिक असतं. त्यामुळे लिंबू पाणी प्यावे. पांढरी साखर जास्त खाल्ल्याने देखील रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्याऐवजी गुळाचा वापर करावा. हळदीसोबत काळी मिरी घेतल्यावर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. सोबतच मनाला सकारात्मक ठेवणे आवश्यक आहे. सकारात्मक मन हे निरोगी शरीर ठेवण्यास मदत करते. घरात वेळ घालवताना छंद जोपासा, चांगली पुस्तकं वाचा जेणेकरुन तुमचे मन सकारात्मक राहिल.
"जिंदगी मौत ना बन जाए..." पोलिसांचा गाण्याद्वारे लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन
मी स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवलंय मी स्वतःला आयसोलेशनमध्ये आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सात वेगवेगळ्या ठिकाणी मी नियमित ध्यान घेत आहे. ध्यान केल्याने मनातून नकारात्मकता दूर जाते. घरी बसावं लागतंय याला शिक्षा न समजता संधी समजा. त्यामुळे सकारात्मक गोष्टी करा. आपल्या केंद्र सरकारने केलेला लॉकडाऊन खूप आवश्यक होता. जगाची अवस्था पाहाता आपल्या देशाने वेळीच पाऊल उचललं आहे. सध्याची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे घरात राहणे हे आपल्यासह समाजासाठी आणि पर्यायाने सर्वांसाठी चांगले आहे. ध्यान करण्याअगोदर आधी मनाची तयारी असायला हवी. एकदा मनाने तयारी केली तर तुम्हाला ध्यानाचे फायदे होतील. मात्र, मनावर बळजबरी करू नका. ध्यान करताना जे मनात येईल ते स्वीकारा, यामुळे मनाला शांती मिळेल.
संवेदनशीलता दाखवत खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरु ठेवावेत : राजेश टोपे
राज्यातील कोरोनाचा आकडा वाढला राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोल्हापूरमध्येही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. कोल्हापूरमध्ये 2 तर सांगलीमध्ये नव्याने 3 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. पुण्यामध्येही 1 रुग्ण कोरोना बाधित सापडला आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 136 वर पोहचली आहे. देशातही कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहे. सध्या देशात 724 कोरोना बाधित रुग्ण आहेत.
Sri Sri Ravi Shankar | कोरोना विषाणूपासून दूर राहण्यासाठी श्री श्री रविशंकर यांचं मार्गदर्शन | विशेष मुलाखत