एक्स्प्लोर
थर्टी फर्स्टसाठी मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रभर विशेष लोकल
मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण 12 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
मुंबई : थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रभर विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पार्टी मध्यरात्री उशिरापर्यंत रंगत आली, तरी शेवटची गाडी चुकेल याची काळजी करण्याची गरज नाही.
मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण 12 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. यापैकी 8 पश्चिम रेल्वे मार्गावर, तर 4 गाड्या मध्य रेल्वे मार्गावर सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर पडणारांची गैरसोय टळणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी-कल्याण (डाउन) मध्यरात्री 1.30 आणि मध्यरात्री तीन वाजता सोडली जाईल. कल्याण-सीएसएमटी (अप) मार्गावर मध्यरात्री 1.30 आणि मध्यरात्री तीन वाजता सोडली जाईल.
नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईकर गेट ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्हला जातात. मात्र मध्यरात्री पहाटे येण्यासाठी सुविधा नसल्याने गैरसोय होते. त्या पार्श्वभूमीवर मध्य आणि पश्चिम रेल्वेने मुंबईकरांसाठी खुशखबर दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement