एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत 20-20 वर्ष राहून मराठी कशी येत नाही, रिअल रँचोने खडसावलं
शनिवारी रात्री नऊ वाजता हा प्रेरणादायी माझा कट्टा एबीपी माझावर प्रदर्शित होणार आहे.
मुंबई: एखाद्या व्यक्तीची इच्छा असेल तर दोन आठवड्यात कुठलीही भाषा शिकता येते, मी दोन आठवड्यात मराठी शिकून दाखवतो, असा निर्धार सोनम वांगचूक यांनी व्यक्त केला. ते माझा कट्टयावर बोलत होते. आज शनिवारी रात्री नऊ वाजता हा प्रेरणादायी माझा कट्टा एबीपी माझावर प्रदर्शित होणार आहे.
वांगचूक हे लडाखमध्ये राहून विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशील शाळा चालवतात.
थ्री इडियट्स चित्रपटातील आमिर खाननं केलेली फुन्सूक वांगडूची भूमिका ही वांगचूक यांच्या कार्यावर आधारलेली आहे हे विशेष.
जर तुमची मातृभाषा पक्की असेल, तर तुम्ही जगातील कोणतीही भाषा सहज शिकू शकता. एखाद्या शहरात 20-20 वर्ष राहणारे लोक, त्या शहराची भाषा बोलू शकत नाहीत, ही त्यांच्यासाठी अभिमानाची नाही तर लाजिरवाणी बाब आहे, असं वांगचूक म्हणाले.
"मला मराठी येत नाही. मात्र मी चिंतीत होतो की मुंबईसारख्या शहरात दर दोन- तीन व्यक्तींमागे एक जण हा परराज्यातला आहे., पण ते 20-20 वर्ष मुंबईत, महाराष्ट्रात राहूनही ते मराठी बोलत नाहीत. मी मराठी बोलत नाही, असं ते गर्वाने सांगतात. मात्र त्याची त्यांना लाज वाटायला हवी. एखाद्या शहरात तुम्ही राहात असाल, तर तुम्हाला ती भाषा यायलाच हवी", असं वांगचूक म्हणाले.
वांगचूक यांनी लडाखमधील लोकांना उन्हाळ्यात पाणी उपलब्ध व्हावं म्हणून हिवाळ्यातील बर्फ साठवून ठेवण्याचं तंत्र विकसीत केलं. तसंच त्यांच्या खास शाळेतली सगळी उपकरणं त्यांनी सौर ऊर्जेवर चालवण्यासाठीही अनेक संकल्पना राबवल्या.
आता महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी ते महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागासोबत काम करणार आहेत. त्यानिमित्तानं शनिवारी रात्री नऊ वाजता हा प्रेरणादायी कट्टा पाहण्यास विसरु नका.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
लातूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement