एक्स्प्लोर
मुंबईतील चर्नी रोड स्टेशनजवळील पुलाचा काही भाग कोसळला!
गेल्या आठवड्यात याच पुलासाठी आंदोलन झालं होतं.
मुंबई : चर्नीरोड स्टेशनजवळील पुलाच्या पायऱ्यांचा काही भाग कोसळला. यात दोन जण जखमी झाले आहेत.
विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात याच पुलासाठी आंदोलन झालं होतं.
चर्नीरोड स्टेशनजवळील पुलाच्या पायऱ्यांचा काही भाग कोसळला. हा पूल एका बाजूने झुकल्याचंही समजतं आहे. हा पूल धोकादायक अवस्थेतच होता. त्याच्या पुनर्बांधणीचं काम सुरु करण्यासाठी तोडकामही सुरु करण्यात आलं आहे. हे काम सुरु असतानाच या पुलाचा काही भाग कोसळला.
रेल्वेच्या काही एचटी केबल्स गेल्यामुळे सात ते आठ दिवस काम थांबलेलं होतं.
या पुलाबाबत वारंवार स्थानिकांनी तक्रारी दिल्या महापालिकेला सोमवारी पथनाट्याच्या माध्यमातून महापालिका अधिकाऱ्यांना ‘गेट वर्क सून’ आंदोलन केले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement