एक्स्प्लोर

खासदारकी वाचवण्यासाठी भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य पुन्हा हायकोर्टात, कॅव्हेटही दाखल

या प्रकरणी तपासणीसाठी नियुक्त केलेल्या दक्षता समितीने तपासणी करुन आपला अहवाल सादर केला. या अहवालात खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पुराव्यासाठी दाखल केलेला नमुना संशयास्पद असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

मुंबई : जात पडताळणी समितीने जातप्रमाणपत्र रद्द केल्यानं खासदारकीच धोक्यात आल्यानं वादाच्या भोवऱ्यात अडकलेले सोलापूरमधून भाजप खासदार डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. सोलापूरमधून भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी म्हणजेच नूरदय्यास्वामी गुरुबसप्पा हिरेमठ यांनी साल 2019 च्या लोकसभा निवडणूकीत बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या शाळेच्या दाखल्यावर 'हिंदू लिंगायत' असा उल्लेख असूनही त्यांनी 'बेडा जंगम' जातीचा बनावट दाखला तयार केल्याचा आरोप करत अपक्ष उमेदवार आणि माजी महापौर प्रमोद गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीकडे याची तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर हायकोर्टानं जात पडताळणी समितीला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्या दरम्यान जातपडताळणी समितीने खासदार सिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला अवैध ठरवून रद्द केला. त्यामुळे खासदारकी अडचणीत आलेल्या शिवाचार्य यांनी जातपडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेत दाखल केलेल्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. कॅव्हेटही दाखल दरम्यान खासदार डॉ.जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या याचिकेवर कोणताही निर्णय देताना आपली बाजू ऐकूण घेतल्याशिवाय एकतर्फी निर्णय घेऊ नये अशा आशयाचे कॅव्हेट सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मुळे यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दाखल केले आहे. खासदारांचा जातीचा दाखला हरवला, पोलिसात तक्रार दाखल!  दरम्यान, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी आपला जातीचा दाखला हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. 9 फेब्रुवारी रोजी अक्कलकोट-सोलापूर प्रवासादरम्यान वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीत जातीचा दाखला गहाळ झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. 14 फेब्रुवारी रोजी खासदारांनीच ही तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे 15 फेब्रुवारी रोजीच सोलापूर जात पडताळणी समितीच्या कार्यालयात या प्रकरणावर सुनावणी सुरु असताना दाखला उच्च न्यायलयात असल्याची माहिती खासदारांच्या वकीलांनी दिली होती. त्यामुळे दाखला नेमकं आहे तरी कुठे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सोलापुरात भाजपला धक्का; खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला अवैध काय आहे प्रकरण? खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी लोकसभा निवडणुकीत 1982 सालचा बेडा जंगम जातीचा दाखला सादर केला होता. मात्र हा दाखला बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनायक कंडकुरे यांनी केली होती. त्यावर सोलापुर जिल्हा जात पडताळणी कार्यालयात 15 फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी पार पडली. त्यानंतर हा निकाल राखून ठेवण्यात आला होता आणि तो निकाल 24 फेब्रुवारी रोजी करण्यात आला. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी आपण सादर केलेला दाखला वैध असल्याचे सांगत सन 1344 व 1347 फसली सालातील मोडी लिपीतील नमुना पुराव्यासाठी सादर केला होता. याच्या तपासणीसाठी दक्षता समितीने तपासणी करुन आपला अहवाल सादर केला. या अहवालात खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पुराव्यासाठी दाखल केलेला नमुना संशयास्पद असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Embed widget