एक्स्प्लोर
...आता सोलापूरच्या खासदारांचा जातीचा दाखला हरवला, पोलिसात तक्रार दाखल!
जात पडताळणी समितीने खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी लोकसभेत सादर केलेला बेडा जंगम जातीचा दाखला अवैध असल्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी उच्च न्यायलयात धाव घेतली आहे.
सोलापूर : सोलापूर जात पडताळणी समितीने भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जातीचा दाखला अवैध असल्याचा निर्णय दिल्यानंतर आता आणखी एक वेगळीच माहिती समोर आली आहे. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी आपला जातीचा दाखला हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. 9 फेब्रुवारी रोजी अक्कलकोट-सोलापूर प्रवासादरम्यान वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीत जातीचा दाखला गहाळ झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. 14 फेब्रुवारी रोजी खासदारांनीच ही तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे 15 फेब्रुवारी रोजीच सोलापूर जात पडताळणी समितीच्या कार्यालयात या प्रकरणावर सुनावणी सुरु असताना दाखला उच्च न्यायलयात असल्याची माहिती खासदारांच्या वकीलांनी दिली होती. त्यामुळे दाखला नेमकं आहे तरी कुठे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
जात पडताळणी समितीने खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी लोकसभेत सादर केलेला बेडा जंगम जातीचा दाखला अवैध असल्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी उच्च न्यायलयात धाव घेतली आहे. खासदारांचे वकील अॅड. संतोष न्हावकर यांनी जिल्हा जात पडताळणी समितीचा निर्णय मान्य नसून निकाल रद्द बातल ठरवण्यासाठी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. मात्र अशात खासदारांनीच आधीच दाखला रद्द झाल्याची तक्रार नोंदवल्याने राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा रंगू लागली आहे.
काय आहे प्रकरण?
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी लोकसभा निवडणुकीत 1982 सालचा बेडा जंगम जातीचा दाखला सादर केला होता. मात्र हा दाखला बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनायक कंडकुरे यांनी केली होती. त्यावर सोलापुर जिल्हा जात पडताळणी कार्यालयात 15 फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी पार पडली. त्यानंतर हा निकाल राखून ठेवण्यात आला होता आणि तो निकाल 24 फेब्रुवारी रोजी करण्यात आला. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी आपण सादर केलेला दाखला वैध असल्याचे सांगत सन 1344 व 1347 फसली सालातील मोडी लिपीतील नमुना पुराव्यासाठी सादर केला होता. याच्या तपासणीसाठी दक्षता समितीने तपासणी करुन आपला अहवाल सादर केला. या अहवालात खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पुराव्यासाठी दाखल केलेला नमुना संशयास्पद असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
जिल्हा जात पडताळणी समितीच्या निकालपत्रात काय आहे?
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या विरोधात सोलापूर जिल्हा जात वैधता पडताळणी समितीने 34 पानांचा निकालपत्र जाहीर केला. जात वैधता पडताळणी समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सुळ यांच्यासह पाच जणांच्या समितीने हा निकाल जाहीर केला. या निकालपत्राच्या शेवटी पाच निर्णय समितीने जाहीर केले आहेत.
1. सामनेवाला श्री. नुरंदस्वामी गुरुबसय्या हिरेमठ उर्फ डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा बेडा जंगम (अजा.) या जातीचा दावा अमान्य करण्यात येत आहे.
2. तक्रारदार क्र 1 ते 3 यांचे तक्रारी अर्ज मंजुर करण्यात येत आहेत.
3. सामनेवाला श्री हिरेमठ नुरंदस्वामी गुरुबसय्या यांच्या नावाचे बेडा जंगम (अजा.) या जातीचे प्रमाणपत्र क्रमांक सर्टिफिकेट एसआर/क्र. 827/1982 दि. 15.01.1982 हे अवैध (INVALID) ठरविण्यात येत आहे.
4. कार्यकारी दंडाधिकारी, तथा तहसिलदार अक्कलकोट, सोलापूर यांनी सामनेवाला श्री. हिरेमठ नुरंदस्वामी गुरुबसय्या यांच्या नावाचे बेडा जंगम (अजा.) या जातीचे बनावट मुळ जात प्रमाणपत्र कायदयातील तरतुदीनुसार जप्त करण्याची कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल समितीस सादर करावा.
5. तहसीलदार, अक्कलकोट, जि-सोलापूर यांनी महाराष्ट्र अनु.जाती, अनु.जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग व्यक्तीना (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम 2000 मधील कलम 11 {(1) अ,ब} कायद्यातील तरतुदी अन्वये सामनेवाला श्री.नुरंदस्वामी गुरुबसय्या हिरेमठ उर्फ डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी व इतर यांचे विरुद्ध मा. न्यायदंडाधिकारी, सोलापूर यांचे न्यायालयात तात्काळ लेखी फिर्याद दाखल करावी.
Marathi language day | मराठीदिनी घराघरातल्या 'गृहमंत्र्यां'ची मराठी कशी आहे? पाहा गमतीदार उत्तरे | ABP Majha
संबंधित बातम्या :
सोलापुरात भाजपला धक्का; खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला अवैध
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement