एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गणेश विसर्जनासंदर्भातील 'त्या' फतव्याबाबत उच्चशिक्षण विभागाला जाग
शिक्षण विभागाच्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासंदर्भातील फतव्याची बातमी एबीपी माझानं दाखवल्यानंतर उच्चशिक्षण विभागाला जाग आली आहे. पुणे विभागाचे सहसंचालक डॉ.विजय नारखेडे यांना या फतव्यासंबंधी कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती माहिती उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी माझाला दिली.
मुंबई : शिक्षण विभागाच्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासंदर्भातील फतव्याची बातमी एबीपी माझानं दाखवल्यानंतर उच्चशिक्षण विभागाला जाग आली आहे. पुणे विभागाचे सहसंचालक डॉ.विजय नारखेडे यांना या फतव्यासंबंधी कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती माहिती उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी माझाला दिली.
पर्यावरण गणेशोत्सवाविरोधात हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे शिक्षण सहसंचालक विजय नारखेडे यांची 29 ऑगस्टला पुण्यात भेट घेतली. त्यानंतर हिंदू जनजागृती समितीनं नारखेडेंना भेटून पर्यावरणपूरक गणेश विसर्जन न करण्यासाठी आणि विद्यार्थ्यानी धर्मपरंपरेप्रमाणं होणारं विसर्जन रोखू नये, यासाठी विद्यार्थ्यांना आदेश देण्याची मागणी केलीय. त्यानंतर शिक्षण विभागानं याबाबत आदेश काढला होता.
महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होण्यास मनाई करावी, असे आदेश यामार्फत देण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विभागातील सर्व महाविद्यालयांना देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला होता.
विशेष म्हणजे, या आदेशासोबत शिक्षण विभागाने महाविद्यालयांना मार्गदर्शनासाठी हिंदू जनजागृती समितीचं पत्रही जोडलं होतं. शिक्षण विभागाच्या या कारभाराची पोलखोल एबीपी माझानं काल केली.
यानंतर खडबडून जागे झालेल्या उच्चशिक्षण विभागाने, याबाबत नारखेडेंना जाब विचारला आहे. उच्चशिक्षण विभागाने याबाबत नारखेडेंना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी माझाला दिली.
संबंधित बातम्या
विद्यार्थ्यांनो, पर्यावरणपूरक गणेश विसर्जनात सहभागी होऊ नका, पुणे विद्यापीठाचा अजब फतवा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement