एक्स्प्लोर
Advertisement
विधानसभा उपाध्यक्षपदी शिवसेनेचे विजय औटी बिनविरोध!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विजय औटी यांना आसनस्थ केलं.
मुंबई : भाजप- शिवसेना युतीच्या सत्ता स्थापनेपासून रिक्त असलेल्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची माळ शिवसेनेच्या विजय औटी यांच्या गळ्यात पडली आहे. काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्ज मागे घेतल्याने विजय औटी यांची बिनविरोध निवड झाली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विजय औटी यांना आसनस्थ केलं.
राज्य विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी काल सभागृहात केली. त्यानुसार आवश्यकता भासल्यास आज मतदान घेतलं जाणार होतं. या निवडणुकीसाठीची नामनिर्देशनपत्रे गुरुवार 29 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 11.45 वाजेपर्यंत विधानमंडळाचे प्रधान सचिव यांच्या दालनात सादर करायची होती.
यात शिवसेनेचे विजय औटी, काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांचे अर्ज आले आहेत. मात्र हर्षवर्धन सकपाळ आणि बच्चू कडू यांनी उपाध्यक्षपदाचा अर्ज मागे घेतल्याने विजय औटी यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली.
विजय औटी यांचा अल्पपरिचय
- 1975 - पासून विद्यार्थी चळवळीला सुरुवात
- 1977 - सरकारी कर्मचाऱ्यांच्या 52 दिवसांच्या संपाला पाठिंबा सत्याग्रहात 7 दिवस विसापूर जेलमध्ये तुरुंगवास
- 1978 - दुष्काळात विद्यापीठ परीक्षा फी सरकारने भरावी म्हणून तत्कालीन शिक्षण राज्यमंत्र्यांना पारनेर तहसील कचेरीवर घेराव आंदोलन यशस्वी. विद्यार्थ्यांची परीक्षा फी मुख्यमंत्री निधीतून भरण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
- 1985 - विधानसभेची पहिली निवडणूक लढवली, 2200 मतांच्या फरकाने पराभूत
- 1988 - सेनापती बापट नागरी पतसंस्थेची स्थापना, सुपा एमआयडीसी इथे पॅकेज ड्रिंकिंग वॉटर आणि ककोगेटेड बॉक्स निर्मितीचे दोन कारखाने
- 1990 - समता विकास मंडळाच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विनायक विद्या मंदिराती पारनेर इथे स्थापना
- 2000- रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीवर नियुक्ती
- 2002 - जिल्हा परिषदेवर काँग्रेस उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली
- 2004 - विधानसभेवर शिवसेनेतर्फे निवड
- 2006 - पारनेर विधानसभा मतदारसंघाचं अस्तित्त्व अधिसूचनेद्वारे संपुष्टात
- 2008 - दोन वर्षांच्या लढाईनंतर अण्णा हजारे यांच्या नेतृत्त्वाखाली पारनेर-नगर मतदारसंघाचं पुनरुज्जीवन करण्यात यश
- 2009 - विधानसभेवर पुन्हा निवड
- 2014 - विधानसभा निवडणूक पुन्हा जिंकली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
शिक्षण
Advertisement