एक्स्प्लोर
Advertisement
शिवसेना कोविंद यांना पाठिंबा देणार?, मातोश्रीवर आज बैठक
मुंबई: रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदासाठी शिवसेना पाठिंबा देणार की नाही? यावर आज शिक्कामोर्तब होणार आहे. काल (सोमवार) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली होती.
एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा झाली आहे. मात्र कोविंद यांना एनडीएचाच घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचा पाठिंबा मिळणार का?, हे आज स्पष्ट होणार आहे. तेव्हा त्यांना पाठिंबा द्यायचा कि नाही यासाठी शिवसेनेची मातोश्रीवर संध्याकाळी 6 वाजता बैठक होणार आहे.
दरम्यान, काल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. शिवसेनेच्या 51व्या वर्धापन दिनानिमित्त काल मुंबईतल्या षणमुखानंद सभागृहात मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
संबंधित बातम्या:
‘शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत लवकरच कळवू’, उद्धव ठाकरेंचं शाहांना उत्तर
कोविंद यांना पाठिंबा देण्याबाबत उद्धव ठाकरेंचा नकारात्मक सूर
रामनाथ कोविंद यांना JDU-BJD नंतर TRS चंही समर्थन
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याबाबतच्या 10 खास गोष्टी
रामनाथ कोविंद 'एनडीए'चे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
लातूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement