एक्स्प्लोर

शिवसेना सुभाष देसाईंच्या पाठीशी : उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख म्हणाले की, "पण आरोप कर राजानीमा दे, असा पायंडा पडला तर ते महाराष्ट्राच्या प्रतिमेला साजेसं नसेल.

मुंबई : शिवसेना सुभाष देसाई यांच्या पाठीशी आहे, असं सांगत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देसाईंची पाठराखण केली. विरोधकांच्या मागणीनंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राजीनाम्याच्या तयारी दाखवली. त्यावर उद्धव ठाकरेंनी पक्षाचा देसाईंना पाठिंबा असल्याचं सांगितलं. एआयडीसीतील अधिसूचित जमिनीपैकी 60 टक्के भूखंड वगळल्याचा आरोप करत विरोधकांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर देसाईंनी राज्यानाम्याची तयारी दर्शवली आहे. मात्र राजीनामा देण्याची काहीही गरज नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचं देसाई म्हणाले. विरोधकांची निष्पक्ष चौकशी करा : उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे म्हणाले की, "भ्रष्टाचाराने बरबटलेल्या विरोधकांनी ज्या पद्धतीने आरोप केले आणि चिखल उडवला, ही गोष्ट लांच्छनास्पद आहे. आरोप करणारे हे स्वत: भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये गुंतले आहेत. अशा घोटाळेबाज लोक वर तोंड करुन आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात ही गोष्ट लाजिरवाणी आहे." विरोधकांच्या आरोपांनंतर सुभाष देसाईंची राजीनाम्याची तयारी "एवढे आरोप झाल्यानंतर काल सुभाष देसाई माझ्याकडे आले. त्यांनी संपूर्ण प्रकरण मला सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी निष्पक्षपातीपणे चौकशी करण्याचं वचन विधानसभेत दिल्याचं देसाईंनी सांगितलं. एक शिवसैनिक म्हणून मी पदाला चिकटून राहणार नाही, मी राजीनामा देऊन मोकळा होतो. मंत्री म्हणून दबाव येऊ नये. कोणाला वाटत असेल तर मी राजीनामा देतो. त्यानुसार आज सकाळी ते मुख्यमंत्र्यांकडे गेले," असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. शिवसेना पक्षप्रमुख म्हणाले की, "पण आरोप कर राजानीमा दे, असा पायंडा पडला तर ते महाराष्ट्राच्या प्रतिमेला साजेसं नसेल. घोटाळे केलेल्या विरोधकांची निष्पक्षपातीपणे चौकशी करुन जर ते गुन्हेगार असतील तर त्यांना त्याची शिक्षा मिळायला पाहिजे, अशी शिवसेनेची विनंती आहे." सुभाष देसाईंवरील आरोप नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी 600 एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र शिवसेनेच्या जवळच्या बिल्डरला फायदा मिळावा यासाठी यातली 400 एकर जमीन देसाईंनी आरक्षित भूखंडातून वगळल्याचा आरोप विरोधकांनी सुभाष देसाईंवर केला आहे. त्यामुळे उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांनी सभागृहात केली होती. त्यानंतर सुभाष देसाईंनी चौकशी होईपर्यंत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारला नाही. पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढेंकडून महत्त्वाची जबाबदारी काढून घेतली, पालक सचिवपदावरून चारच महिन्यात हटवलं
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंकडून महत्त्वाची जबाबदारी काढून घेतली, पालक सचिवपदावरून चारच महिन्यात हटवलं
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जून 2026 | मंगळवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जून 2026 | मंगळवार
सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात; तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं कौतुक, अधिकाऱ्यांना सल्ला
सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात; तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं कौतुक, अधिकाऱ्यांना सल्ला
काळे धंदे लपवण्यासाठी बाळासाहेबांचा आधार घेऊ नका, उद्धव ठाकरेंमुळंच मी विधानपरिषदेचा राजीनामा दिला, पावसकरांचा हल्लाबोल
काळे धंदे लपवण्यासाठी बाळासाहेबांचा आधार घेऊ नका, उद्धव ठाकरेंमुळंच मी विधानपरिषदेचा राजीनामा दिला, पावसकरांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Sanjay Jadhav On Thackeray: ठाकरेंची चूक, राऊतांवर नाराजी ते आत्ताची भूमिका; संजय जाधव थेट बोलले
Sanjay Dina Patil on Uddhav Thacekray and Shivsena : मला सिक्युरिटीची गरज नाही, गरज त्यांना आहे
Vidhan Parishad : विजयासाठी सेटिंग, क्रॉस व्होटिंग, पाच जागांवर मविआची मतं फुटली | Special Report
Opration Tiger : ऑपरेशनचा सिक्सर 2029 वर नजर, ऑपरेशन टायगर कशासाठी? | Special Report
Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढेंकडून महत्त्वाची जबाबदारी काढून घेतली, पालक सचिवपदावरून चारच महिन्यात हटवलं
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंकडून महत्त्वाची जबाबदारी काढून घेतली, पालक सचिवपदावरून चारच महिन्यात हटवलं
IPS Transfer : मोठी बातमी! डॅशिंग अधिकारी विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलीस आयुक्त, रवींद्र सिंघल यांची ACB मध्ये बदली
मोठी बातमी! डॅशिंग अधिकारी विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलीस आयुक्त, रवींद्र सिंघल यांची ACB मध्ये बदली
Pune Crime : लग्नासाठी 14 कोटींचा पॅलेस, 2 विमानं बुक! पण प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला, लोहगडच्या ट्रेकिंगला नेऊन दरीत ढकललं
लग्नासाठी 14 कोटींचा पॅलेस, 2 विमानं बुक! पण प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला, लोहगडच्या ट्रेकिंगला नेऊन दरीत ढकललं
जयकुमार गोरेंनी दंड दाखवला; धैर्यशील मोहिते पाटलांनी 'डायलॉग' मारला, म्हणाले, सोलापूरचा पुरोगामी विचार टिकवला
जयकुमार गोरेंनी दंड दाखवला; धैर्यशील मोहिते पाटलांनी 'डायलॉग' मारला, म्हणाले, सोलापूरचा पुरोगामी विचार टिकवला
सियाच्या इंस्टाग्राम पोस्टचा महिनाभरापूर्वीचा व्हिडिओ समोर; केतनशी गोडीगुलाबीचा संवाद, दाखवायचे दात वेगळेच
सियाच्या इंस्टाग्राम पोस्टचा महिनाभरापूर्वीचा व्हिडिओ समोर; केतनशी गोडीगुलाबीचा संवाद, दाखवायचे दात वेगळेच
मुंबईत तथाकथित 4 साधूंना पकडून मारहाण; संशयास्पद हालचाली दिसल्याने तरुणांनी केले पोलिसांच्या स्वाधीन
मुंबईत तथाकथित 4 साधूंना पकडून मारहाण; संशयास्पद हालचाली दिसल्याने तरुणांनी केले पोलिसांच्या स्वाधीन
समृद्धी महामार्गावर फॉर्च्यूनरचा भीषण अपघात; कारमधील पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरसह 2 लहान मुलं गंभीर

Embed widget