एक्स्प्लोर
Advertisement
नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषद उपसभापतीपदी बिनविरोध निवड
शिवसेनेला उपसभापती पद देऊन राज्यसभेतील उपाध्यक्ष पदाची नाराजी दूर भाजपने दूर केली आहे, तर काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदही मिळेल. अशारीतीने मुख्यमंत्र्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा होत आहे.
मुंबई : विधानपरिषदेच्या उपसभापती पदी शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची निवड झाली आहे. जोगेंद्र कवाडे यांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. दिवाकर रावते यांनी नीलम गोऱ्हे यांची निवड व्हावी यासाठी प्रस्ताव मांडला होता, त्याला महादेव जानकरांनी अनुमोदन दिलं.
काँग्रेसचे माणिकराव ठाकरे जुलै 2018 पर्यंत विधान परिषदेचे उपसभापती होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त आहे. उपसभापती पदावर काँग्रेसनेही दावा केला होता. मात्र विरोधी पक्षनेते पदावरुन भाजपने काँग्रेसला कोंडीत पकडलं. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर हे विरोध पक्षनेते पद रिक्त होते.
त्यामुळे उपसभापती पदासाठीची निवडणूक बिनविरोध पार पडल्यास विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा करु, अशी अट मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसमोर ठेवल्याचं समजत आहे. आज विधानसभेत विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आणि नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषद उपसभापदी बिनविरोध निवड झाली.
शिवसेनेला उपसभापती पद देऊन राज्यसभेतील उपाध्यक्ष पदाची नाराजी दूर भाजपने दूर केली आहे, तर काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदही मिळेल. अशारीतीने मुख्यमंत्र्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा होत आहे.
आणखी वाचा : विजय वड्डेटीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते, विधानसभा अध्यक्षांची घोषणा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
बीड
भारत
Advertisement