एक्स्प्लोर
शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या
शैलेश निमसे हे शहापूरमधील शिवसेनेचे उपतालुका प्रमुख होते.
ठाणे : शिवसेना नेते शैलेश निमसे यांच्या हत्येप्रकरणी पत्नी साक्षी निमसे हिला ठाणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. साक्षीसोबत प्रमोद लुटे या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे. इतर तीन आरोपींचा अद्याप शोध सुरु आहे.
शैलेश निमसे हे शहापूरमधील शिवसेनेचे उपतालुका प्रमुख होते.
भिवंडी तालुक्यातील दिघाशी जवळील देवचोळा येथे शैलेश निमसे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्यांची ओळख होऊ नये म्हणून त्यांचा मृतदेह पेटवण्यात आला होता.
शैलेश निमसे यांची पत्नी साक्षी हिनेच हत्येची सुपारी दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.
शैलेश निमसे यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरुन पत्नीसोबत त्यांचे वाद होत असत. पत्नीला ते मारहाण करायचे. यातून साक्षीने हत्येची सुपारी देत, घरातच शैलेश निमसे यांचा गळा दाबून हत्या केली, असे पोलिस तपासात समोर आले.
विशेष म्हणजे, पोलिसांचा तपास भरकटावा म्हणून शैलेशची पत्नी साक्षी हिने जंगली महाराज ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचा हात आपल्या पतीच्या हत्येत असल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता. मात्र पोलिसांनी उलट तपास करुन सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींतून हत्येचा उलगडा केला.
काही दिवसांपूर्वीच अहमदनगर जिल्ह्यात दोन शिवसैनिकांची राजकीय वादातून हत्या झाली. त्यानंतर मालाडमध्येही एका शिवसेना नेत्याची गोळीबार करुन हत्या करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर शहापूरमधील शिवसेना नेते शैलेश निमसेंची हत्याही गंभीर मानली जात होती. मात्र ती वैयक्तिक कारणांमुळे झाल्याचे समोर आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement