एक्स्प्लोर

Aaditya Thackeray: पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याआधी राजकारण तापलं; आदित्य ठाकरे यांचे महापालिका आयुक्तांना पत्र

Aaditya Thackeray: शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुंबई महापालिकेच्या (BMC) सांडपाणी प्रक्रिया प्लांट  (Sewage Treatment Plant) आणि इतर मुद्यांंबाबत महापालिका आयुक्तांना (BMC Commissioner) पत्र लिहिले आहे.

Aaditya Thackeray: पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधीच राजकारण तापू लागले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहीत सांडपाणी प्रक्रिया प्लांट  (Sewage Treatment Plant) आणि इतर मुद्यांकडे लक्ष वेधले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्लांटचे  (Sewage Treatment Plant) भूमीपूजन करण्यात येणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता श्रेयवादाची लढाई रंगणार आहे. 

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहीले आहे. आदित्य ठाकरे यांनी या पत्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळात सांडपाणी प्रक्रिया प्लांट आणि खारे पाणी गोडे करणे या दोन्ही प्रकल्पांना गती देण्यात आली असल्याची आठवण पत्रातून महापालिका आयुक्तांना करून दिली. एसटीपी  (Sewage Treatment Plant)  प्रकल्पांची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असतानाही अद्याप भूमिपूजन का नाही? असा सवाल आदित्य यांनी केला. मागील सहा महिन्यांचा कालावधी कशासाठी वाया घालवला, असा प्रश्नही आदित्य यांनी पत्रातून उपस्थित केला आहे. 

खा-या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याच्या प्रकल्पाला होत असलेल्या उशिराबद्दलही आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी प्रकल्पांचे भूमिपूजन लांबवल्याचा सूर पत्रातून उमटला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी मुंबई महापालिकेच्या एसटीपी प्रकल्पांसह विविध विकासकामांचे उद्धाटन करणार आहेत.

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात कोणत्या प्रकल्पांचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात मुंबई मेट्रो 2 ए  (Mumbai Metro 2A) आणि मेट्रो 7 (Mumbai Metro 7) या मार्गिकेवरील मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मागील वर्षी करण्यात आले होते. दोन्ही मार्गिकेवरील एकत्रिपणे पहिल्या टप्प्यामध्ये 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आता मार्गिकेवरील दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून या मार्गिकेचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईतील काँक्रिटच्या रस्ते बांधकामाचे भूमीपूजन होणार आहे. त्याशिवाय  बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेतंर्गत 52 दवाखान्याचे उद्घाटन होणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Embed widget