एक्स्प्लोर
Advertisement
‘कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलावा’, शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई: शिवसेनेच्या मंत्र्यांनी आज (मंगळवारी) ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. विधीमंडळ गट नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी केली.
GST मंजूर करून घेण्यासाठी बोलावलेलं 3 दिवसांचं विशेष अधिवेशन 5 दिवसांचं करा. अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, भाजपच्या इतर गटनेत्यांशी चर्चा करून याबाबत 2 दिवसात निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सेना मंत्र्यांना दिलं आहे.
‘कर्जमाफी करणं हा सर्वात पहिला विषय आहे. अवकाळी पाऊस आमि गारपीट यांना शेतकरी त्रस्त आहे. त्यामुळे या सगळ्याच विषयांवर विशेष अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो. मुख्यमंत्री देखील सकारात्मक आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलवावं अशी आम्ही मागणी केली आहे.’ अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
‘दोन दिवस अधिवेशन आणखी घ्यावं. अशी मागणी शिवसेनेनं आज मुख्यमंत्र्यांकडे केली. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांसाठीच आपण इथे बसलेलो आहोत. मुख्यमंत्र्यांनी भाजप गट नेत्यांशी चर्चा करून निर्णय कळवतो असं आश्वासन दिलं आहे.’ असं पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले.
शिवसेना शिष्टमंडळाच्या भेटीनंतर तात्काळ तूर खरेदी सुरु:
दरम्यान, तूर प्रश्नावरही रामदास कदम यांनी उत्तर दिलं. 'शिवसनेचं शिष्टमंडळ उद्धवजींच्या आदेशानुसार मुख्यमंत्र्यांना भेटलं. या भेटीनंतर त्यांना जी तूर खरेदी बंद होती ती तात्काळ सुरु करण्यात आली. जितके शेतकरी खरेदी केंद्रावर उभे होते त्या सर्वांची तूर खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेनं काहीच केलं नाही असं म्हणता येणार नाही.' असंही रामदास कदम म्हणाले.
संबंधित बातम्या:
शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच, पूर्वतयारी सुरु : चंद्रकांत पाटील
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement