एक्स्प्लोर

Shivsena Dasra Melawa 2021 : दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंच्या तडाख्यात कोण सापडणार?

Shivsena Dasra Melawa 2021 : दसरा मेळावा शिवसैनिकांसांठी एक उर्जेचा स्रोतच जणू. बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत दसरा मेळाव्यात शिवसैनिक हजारोंच्या संख्येनं गर्दी करतात.

Shivsena Dasra Melawa 2021 : दरवर्षी शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा कोरोना काळात बंद हॅालमध्ये कमी लोकाच्या उपस्थित होऊ लागला आहे. पण तरीही उद्धव ठाकरेंच्या भाषणानं सैनिकांमध्ये तोच जोश पाहायला मिळतोय यंदाच्या मेळाव्यात ठाकरेंची तोफ कुणाकुणावर डागणार? ठाकरेंच्या तावडीत कोण सापडणार? सैनिकांना मेळाव्यात नवीन उर्जा मिळाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दसरा मेळावा शिवसैनिकांसांठी एक उर्जेचा स्रोतच जणू. बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत दसरा मेळाव्याल्या शिवसैनिक हजारोंच्या संख्येनं गर्दी करतात आणि एक नविन उर्जा घेऊन पक्षाच्या कामाला सुरुवात करतात. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला एक वेगळीच परंपरा आहे. गेली अनेक वर्ष शिवाजी पार्कच्या मैदानात ठाकरेंची तोफ धडधडायची. पण यंदा हा सोहळा षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने भाषण देणाऱ्या ठाकरेंना यंदा मोजक्याच लोकांसमोर भाषण करावं लागणार आहे. पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहचण्यासाठी ॲानलाईनची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या मेळाव्याला शिवसेनेचे नेते, मंत्री, आमदार विभागप्रमुख, महापौर आणि महापालिकेतले महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. 

आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत सैनिकांसाठी हा मेळावा अत्यंत महत्वाचा आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्यानं उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर राज्यातले आणि केंद्रातले भाजपचे नेते असतील असं म्हटलं जातंय. तसेच यातील सर्वात महत्वाचा मुद्दा असणार आहे, तो म्हणजे केंद्रीय यंत्रणा. गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय यंत्रणा राज्यातल्या विविध नेत्यावर कारवाई सुरु आहे. ईडी, सीबीआय आणि आता एनसीबीच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं आहे. अशातच शिवसेना महाविकास आघाडीसोबत जरी असली तरी सावरकरांना भारतरत्न देण्याची त्यांची आजही आग्रही मागणी राहिली आहे. त्यामुळे शिवसेनेचं सावरकर प्रेम अजुनही कमी झालेलं नाही. त्यामुळं नव्यानं सावरकरामुळे सुरु झालेल्या वादावर उद्धव ठाकरे खरपूस समाचार घेतील.

लखीमपूर प्रकरणात केंद्र सरकारचा चिडीचूपपणा, महाराष्ट्र बंद शेतकरीविरोधी धोरणं यावर उद्धव ठाकरे आवर्जुन बोलणार राज्यातल्या शेतकरी धोरणं जाहीर करतील. कोरोना काळात मुंबई महाराष्ट्र वगळता ॲाक्सिजन आणि लसीवरून जे राजकारण रंगलं त्यावरून उद्धव ठाकरे जाहिरपणे बऱ्याचवेळा बोलले, पण आगामी निवडणुकांच्या पाश्वर्भूमिवर राज्यात काय काय केलं? हे सांगायला ठाकरे विसरणार नाहीत. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त सदस्यांची नावं भगतसिंग कोश्यारी मंजूर करत नाहीत. तसेच विविध धोरणात राज्यपाल आणि सरकारमध्ये एकमत नसतानाचे बरेच किस्से आहेत. त्यामुळे ठाकरे राज्यपालांचाही समाचार घ्यायला विसरणार नाहीत.  

शिवसेना धर्मनिरपेक्ष विचारवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातात हात घालून आहेत. पण राम मंदिर, हिंदुत्व, भगवा यावर शिवसेना अजुनही ठाम आहे. त्यामुळे आपली विचारधार बदलेली नाही आणि बदलणार नाही हे दाखवून देणार आहेत. राज्यात आगामी महाविकास विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरु आहे. त्यात रोज नवनवीन टीका टिपण्णी ऐकायला मिळते. पण त्यावर ठाकरे सहजासहजी बोलत नाहीत. या मेळाव्यात भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांचा समाचार  घेणार एवढं नक्की. 

गटप्रमुखापासून ते विभागप्रमुखापर्यंत शिवसेनेची मोर्चेबांधणी असते. राज्यात मिनी विधानसभा निवडणुका होणार आहेत. म्हणजेच, महानरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला एकहाती भगवा फडकवायचा आहे. त्याासाठी सैनिकांच्या अंगात उर्जा निर्माण करण्याचं काम ठाकरे करतील. 

गेल्या मेळाव्याआधी महाराष्ट्र, मुंबई आणि शिवसेनेवर विरोधकांकडून चिखलफेक करण्यात आली. सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू, अर्णब गोस्वामी आणि कंगना रनौतचं प्रकरणाचा ठाकरेंनी आपल्या ठाकरे शैलीत हिसाब घेतला होता. आता विषय बदलले आहेत आणि परिस्थितीही त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर कोण कोण असणार? हे मेळाव्यातच कळेल. 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसैनिकांची छाती अभिमानानं आधीच फुलली आहे. त्यात मेळाव्यात भाजप आणि टीमवर शब्दांचे बाण फेकत शिवसैनिकांमध्ये उर्जा भरण्याचं काम उद्धव ठाकरे करतील. त्यामुळे आगामी निवडणुका आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेता शिवसेनेसाठी हा मेळावा उर्जादायी ठरतोय का? हे निवडणुकांचा काळच ठरवेल.  .

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची संख्या महिन्याभरात 5 लाखांनी घटलीSpecial Report Girl Safety : सांगली आणि बुलढाण्यात चिमुरड्यांवर अत्याचार, नराधमांना कधी वचक बसणार?Special Report Rahul Gandhi Election Commission:राहुल गांधींचे आक्षेप,निवडणूक प्रक्रियेवर टीकेची झोडSpecial Report Shiv Sena Thackeray Vs Shinde : शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर' ठाकरेंची झोप उडवणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक  करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
Dharashiv News : ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
Embed widget