एक्स्प्लोर
Advertisement
अनधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी लाच, शिवसेना नगरसेवकास अटक
एका घराची बेकायदा उंची वाढवण्याच्या कामाची तक्रार करु नये म्हणून तक्रारदाराकडे 25 हजार रुपयांची मागणी भोईर याने केली होती. अखेर 10 हजारांवर तडजोड झाली.
मीरारोड : काशिमीरा भागातील शिवसेनेचे नगरसेवक कमलेश भोईर याला लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई करु नये यासाठी 10 हजारांची लाच मध्यस्थामार्फत घेतल्याप्रकरणी भोईर याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री मध्यस्थासह अटक केली आहे.
मुंशी कंपाऊंडमध्ये अनेक बेकायदा बांधकामे सुरु आहेत. त्यातीलच एका घराची बेकायदा उंची वाढवण्याच्या कामाची तक्रार करु नये म्हणून तक्रारदाराकडे 25 हजार रुपयांची मागणी भोईर याने केली होती. अखेर 10 हजारांवर तडजोड झाली.
तक्रारदाराने सोमवारी रात्रीच्या सुमारास सदरची रक्कम मध्यस्थ असलेला ठेकेदार गोरखनाथ ठाकूर शर्मा याच्याकडे दिल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा आडनाईक यांच्या पथकाने सापळा रचत ही कारवाई केली. 2017 च्या पालिका निवडणुकीत भोईर प्रभाग 15 मधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आला आहे. तर पॅनलमधील अन्य तीन नगरसेवक हे भाजपाचे आहेत.
निवडणुकीआधी आणि नंतर देखील भोईरला भाजपात घेण्याचा प्रयत्न स्थानिक नेतृत्वाने केला होता. मीरा गावातील कमलेश भोईर आणि त्याचे कुटुंब हे अतिशय श्रीमंत मानले जाते. त्यांच्या कुटुंबियांची मोठ्या प्रमाणात मालमत्ता आहे. त्यामुळे बेकायदा बांधकाम प्रकरणात लाच मागितल्याप्रकरणी आश्चर्य व्यक्त होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
क्राईम
Advertisement